India-Maldive: भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादाचा परिणाम काही भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर दिसून येत आहे. बर्याच कंपन्यांनी मालदीवशी संबंधित बुकिंग रद्द केले आहेत. मात्र दोन दिवसांत या वादाचा पुरेपूर फायदा एका कंपनीला झाला आहे.
या कंपनीने काल आणि आजपर्यंत गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा दिला आहे. एवढेच नाही तर शेअरने आज नव्या उच्चांकालाही स्पर्श केला आहे.
प्रवेग असे या कंपनीचे नाव असून तिने दोन दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील राजकीय वादाचा फायदा प्रवेगला मिळत आहे. तसेच 'चलो लक्षद्वीप' सारख्या मोहिमेला लोकांचा पाठिंबा आहे.
प्रवेग ही एक लक्झरी रिसॉर्ट कंपनी आहे आणि ती अहमदाबादस्थित स्मॉल कॅप फर्म आहे. ही कंपनी लक्षद्वीपमध्ये टेंट सिटी बनवत आहे आणि लक्षद्वीपमध्ये व्यवसाय करणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. सध्या सुरू असलेल्या वादानंतर लोकांचे लक्ष या कंपनीकडे वळले आहे.
शेअर एक वर्षाच्या उच्चांकावर
प्रवेगने आजच्या व्यवहारात एक वर्षाचा उच्चांक गाठला आहे आणि कंपनीचा शेअर रुपये 1187.95 वर पोहोचला आहे. तसेच EaseMyTripसह काही कंपन्यांनी मालदीवसोबतच्या व्यवसायावर तात्पुरता ब्रेक लावला आहे किंवा काही कंपन्यांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये InsuranceDekho सारख्या फर्मचाही समावेश आहे. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या 'अपमानजनक' टिप्पणीनंतर हा वाद सुरू झाला आणि हे प्रकरण वाढल्यानंतर भारतात मालदीववर बहिष्कार टाकला जात आहे.
मालदीव सरकारने आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले असले तरी, भारतातील लोक हे प्रकरण सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. परिणामी, कंपन्या आणि प्रवासी या देशावर बहिष्कार टाकत आहेत आणि भारताचे स्वतःचे बेट लक्षद्वीपकडे जाण्याचा आग्रह धरत आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.