Share Market News: भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार, सोमवारी भारतीय एक्सचेंजेसवर स्टॉकचे मूल्य 4.33 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. तर, हाँगकाँग मार्केटचा हा आकडा 4.29 ट्रिलियन डॉलर होता. यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे.
5 डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजाराचे मार्केट कॅप प्रथमच 4 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले. यापैकी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर गेल्या चार वर्षांत आले. भारतीय बाजारपेठ आता जागतिक गुंतवणूकदार आणि कंपन्यांना नवीन भांडवलासाठी आकर्षित करत आहे.
“भारतातील वाढीसाठी सर्व गोष्टी योग्य आहेत,” असे मुंबईतील अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता यांनी सांगितले. भारतीय शेअर्समध्ये सातत्याने होणारी वाढ आणि हाँगकाँगमधील ऐतिहासिक घसरण भारताला या टप्प्यावर घेऊन आली आहे.
बीजिंगमध्ये कठोर कोविड-19 निर्बंध, कॉर्पोरेशनवरील कारवाई, मालमत्ता क्षेत्रातील संकट आणि पाश्चिमात्य देशांसोबतचा भू-राजकीय तणाव यामुळे जगाच्या वाढीचे इंजिन म्हणून चीनच्या आशा संपल्या आहेत.
भारताचा शेअर बाजार का वाढत आहे?
किरकोळ गुंतवणूकदारांची झालेली वाढ आणि चांगली कॉर्पोरेट कमाई यामुळे भारतीय शेअर बाजार वाढत आहेत. अहवालानुसार, स्थिर राजकीय वातावरण आणि जागतिक स्तरावर सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यामुळे जागतिक भांडवल आणि कंपन्यांना आकर्षित करत भारत चीनसाठी एक चांगला पर्याय म्हणून उभा राहत आहे.
चीनच्या वाढीकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली
2023 मध्ये चार वर्षांची विक्रमी घसरण थांबवल्यानंतर हाँगकाँगमधील हँग सेंग चायना एंटरप्रायझेस इंडेक्स आधीच 13% खाली आहे. भारताचे शेअर बाजार विक्रमी उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत असताना ते जवळपास दोन दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर आहेत.
परकीय गुंतवणूकदार जे आतापर्यंत चीनच्या विकासाने प्रभावित झाले होते ते आता आपली गुंतवणूक भारताकडे वळवत आहेत. 2023 मध्ये परदेशी फंडांनी भारतीय शेअर्समध्ये 21 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे देशातील बेंचमार्क S&P BSE सेन्सेक्स निर्देशांक सलग 8 व्या वर्षी वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.