Swiggy IPO: स्विगीची IPO एन्ट्री कधी होणार? तारीख आणि किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

Swiggy IPO: भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा IPO अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
Indian food delivery firm Swiggy IPO plans, aims for 2024 listing
Indian food delivery firm Swiggy IPO plans, aims for 2024 listing Sakal
Updated on

Swiggy IPO: भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा IPO अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता या IPO संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. कंपनी 2024 पर्यंत आपला IPO बाजारात आणू शकते.

कंपनी बर्‍याच दिवसांपासून IPO (Swiggy IPO) आणण्याचा विचार करत होती, परंतु बाजारात चालू असलेल्या चढ-उतारांमुळे काही काळासाठी आपला निर्णय पुढे ढकलला होता.

कंपनीने 8 बँकांशी बोलणी सुरू केली

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी आयपीओ आणण्यासाठी बँकांशी चर्चा करत आहे. स्विगीने 2022 मध्ये बाजारातून शेवटचा निधी उभारला होता. त्यावेळी कंपनीचे मूल्यांकन 10.7 अब्ज डॉलर होते.

पण बाजाराची वाईट परिस्थिती आणि बाकीचे ढासळत चाललेले भारतीय स्टार्टअप्स पाहता कंपनीने आपला आयपीओ प्लॅन काही दिवसांसाठी पुढे ढकलला होता, पण आता पुन्हा एकदा स्विगीच्या आयपीओची चर्चा चालू आहे.

Indian food delivery firm Swiggy IPO plans, aims for 2024 listing
PM Modi: चंद्रयान यशस्वी होताच मोदींची मोठी घोषणा, भारताने अंतराळ उद्योगासाठी केली तब्बल...

कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आठ गुंतवणूक बँकर्सशी बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणूक बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन यासारख्या मोठ्या बँकांचा समावेश आहे.

Indian food delivery firm Swiggy IPO plans, aims for 2024 listing
Inflation in India: महागाई कमी करण्यासाठी सरकार काय करतंय? अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्टचं सांगितलं

IPO कधी येणार?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनी सतत आपल्या IPO वर काम करत आहे आणि यासाठी वेगवेगळ्या बँकांशी बोलत आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार झाले तर कंपनीचा IPO जुलै ते सप्टेंबर 2024 दरम्यान येऊ शकतो.

कंपनी IPO मध्ये 10.7 बिलियन डॉलरचे मूल्यांकन मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कंपनी IPO ची किंमत किती ठरवते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Indian food delivery firm Swiggy IPO plans, aims for 2024 listing
Gold Investment: अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था मंदीत मात्र सोने खरेदीत तेजीत! असं का घडतंय?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.