Stock Market: शेअर बाजाराचा विक्रम! बीएसईचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे; या वर्षात झाली 15 टक्के वाढ

Stock Market: जागतिक बाजारपेठांमध्ये, भारतीय शेअर बाजार अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर बाजाराच्या मार्केट कॅप बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
Indian markets hit historic 4 trillion dollar market cap milestone for the first time
Indian markets hit historic 4 trillion dollar market cap milestone for the first time Sakal
Updated on

Stock Market: भारतीय शेअर बाजाराने आज नवा टप्पा गाठला आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईचे बाजार भांडवल 4.1 ट्रिलियन डॉलर्स किंवा 3,33,26,881.49 कोटी रुपये झाले आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 305.44 अंकांनी वाढून 66,479.64 अंकांवर पोहोचला.

जगातील 5 वी सर्वात मोठी बाजारपेठ

4 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त मार्केट कॅपसह भारतीय शेअर बाजार जगातील पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. भारतीय बाजाराच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगचे शेअर बाजार आहेत. गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजाराने झपाट्याने वाढ केली आहे आणि अल्पावधीतच नवीन उंची गाठली आहे.

पाच सर्वात मोठे स्टॉक मार्केट

देश - बाजार मूल्य

  • अमेरिका: 48 ट्रिलियन डॉलर्स

  • चीन : 10.7 ट्रिलियन डॉलर

  • जपान : 5.5 ट्रिलियन डॉलर्स

  • हाँगकाँग : 4.7 ट्रिलियन डॉलर्स

  • भारत : 4.1 ट्रिलियन डॉलर

Indian markets hit historic 4 trillion dollar market cap milestone for the first time
Cyber Fraud: सायबर फ्रॉडवर कारवाईसाठी सरकार ॲक्शन मोडवर, आता आणणार खास ॲप?

भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक मूल्य

भारताची अर्थव्यवस्था सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर आहे आणि या आकडेवारीसह, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच बीएसईचे मार्केट कॅप यापेक्षा 0.4 ट्रिलियन डॉलर्सने वाढले आहे.

रँकिंगच्या बाबतीत, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार दोन्ही पाचव्या स्थानावर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत, BSE MCap मध्ये 600 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

Indian markets hit historic 4 trillion dollar market cap milestone for the first time
Gold At Record High: सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड, सोने सर्वकालीन उच्चांकावर

याशिवाय, जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली, सीएलएसए आणि नोमुरा यांनी अलीकडेच भारताचे रेटिंग ओव्हरवेटवर अपग्रेड केले आहे. जेपी मॉर्गनने निवडणुका, जीडीपी वाढ आणि बाँड मार्केटमधील सकारात्मक संकेतांवर आधारित रेटिंग अपग्रेड केले आहे.

मॉर्गन स्टॅनलीने आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे आणि कमाईच्या वाढीमुळे अपग्रेड केले आहे. CLSA ने भारताच्या पोर्टफोलिओचे वाटप 20 टक्क्यांनी वाढवले ​​आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.