Dividend Stocks: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन डिव्हिडेंड देणार का? लवकरच होणार निर्णय

Dividend Stocks: कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.
Indian Railway Finance Corporation
Indian Railway Finance CorporationSakal
Updated on

Dividend Stocks: सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (Indian Railway Finance Corporation) आपल्या शेअरधारकांना डिव्हिडेंड जाहीर करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

यामध्ये, सप्टेंबर तिमाहीच्या निकालांसह, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम डिव्हिडेंडवर निर्णय घेतला जाईल. गेल्या शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.71 टक्क्यांनी घसरून 77.05 रुपयांवर बंद झाले. मात्र इंडियन रेल्वे फायनान्स शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत 172% चा चांगला परतावा दिला आहे.

आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी आणि मंजूरीसाठी कंपनीच्या बोर्डाची बैठक गुरुवारी 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असल्याचे इंडियन रेल्वे फायनान्सच्या बीएसई फाइलिंगनुसार समजत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या शेअरधारकांना अंतरिम डिव्हिडेंड जाहीर करण्यावरही बोर्ड विचार करेल.

Indian Railway Finance Corporation
IPO Listing: गुंतवणूकीची मोठी संधी! होनासा कंझ्युमर्सचा आयपीओ 31 ऑक्टोबरला खुला होणार

इंडियन रेल्वे फायनान्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 92.94 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 21.30 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1,00,666.70 कोटी आहे.

भारतीय रेल्वे फायनान्सचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 134 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 1 वर्षात 261 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनी गेल्या 2 वर्षांत 227 टक्के नफा कमावला आहे.

Indian Railway Finance Corporation
Railway Board DA Hike: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! 11 लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.