Hyundai India IPO: भारतीय शेअर बाजाराच्या तेजीत आयपीओ बाजारातील उत्साह कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बाजारात दर आठवड्याला अनेक नवीन IPO लाँच होत आहेत आणि गुंतवणूकदारांना कमाईच्या संधी मिळत आहेत. दरम्यान, आता एलआयसीचा सर्वात मोठा आयपीओचा विक्रम मोडीत निघणार आहे. देशांतर्गत बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO लवकरच येणार आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai लवकरच तिच्या स्थानिक युनिटचा IPO घेऊन येत आहे. Hyundai India च्या IPO प्रस्तावाला बाजार नियामक SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, Hyundai किंवा सेबीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
Hyundai India ही भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेतील टॉप-3 कंपन्यांपैकी एक आहे. भारतीय बाजारपेठेत IPO लॉन्च करण्यासाठी कंपनीने 3 महिन्यांपूर्वी बाजार नियामक सेबीकडे मसुदा दाखल केला होता. Hyundai India ने प्रस्तावित IPO साठी JP Morgan, Citigroup, HSBC सारख्या अनेक बड्या बँकर्सना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे.
यापूर्वी, रॉयटर्सने काही महिन्यांपूर्वी आपल्या एका अहवालात दावा केला होता की Hyundai India च्या प्रस्तावित IPO चा आकार 3 अब्ज डॉलर असू शकतो. भारतीय चलनात हा आकार 25 हजार कोटींहून अधिक आहे.
सध्या, भारतीय बाजारपेठेत सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याचा विक्रम सरकारी विमा कंपनी LIC कडे आहे, ज्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी मे 2022 मध्ये 21 हजार कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला होता. म्हणजेच Hyundai Indiaचा IPO येताच LICच्या नावावर असणारा सर्वात मोठ्या IPO चा विक्रम मोडीत निघेल.
जवळपास दोन दशकांनंतर भारतीय बाजारपेठेत कार कंपनीचा IPO येणार आहे. कार कंपनीचा शेवटचा IPO 2003 मध्ये आला होता, जेव्हा मारुती सुझुकी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली होती. Hyundai च्या एकूण जागतिक व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठेला विशेष महत्त्व आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियानंतर भारतीय बाजारातून सर्वाधिक कमाई होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.