Demat Account: पैसे कमावण्यासाठी शेअर बाजाराकडे लोकांचा कल वाढत आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले डिमॅट खाते उघडण्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता उघडलेल्या डीमॅट खात्यांची संख्या रशिया, जपान आणि मेक्सिकोसारख्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे.