Infosys Record: इन्फोसिसला मोठा धक्का! एकाच दिवसात 10,800 कोटी पाण्यात; वाचा काय आहे कारण?

SBI पासून ते LIC पर्यंत अनेक गुंतवणूकदारांचे इन्फोसिसमुळे मोठे नुकसान झाले आहे.
Infosys Narayana Murthy
Infosys Narayana MurthySakal
Updated on

Infosys Shares: देशातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीसह इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाचे काही सेकंदात मोठे नुकसान झाले आहे.

नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबापेक्षा एलआयसीची इन्फोसिसमध्ये जास्त भागीदारी आहे. इन्फोसिसच्या खराब निकालाच्या आकडेवारीमुळे आज कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

एलआयसीला मोठे नुकसान :

इन्फोसिसच्या शेअर्सच्या घसरणीमुळे एलआयसीला सर्वात मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस, LIC कडे 28,13,85,267 शेअर्स होते, ज्याचे मूल्य गुरुवारच्या बाजार बंद होण्याच्या वेळी 39,073 कोटी रुपये होते.

सोमवारी सकाळी इन्फोसिसमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर, काही सेकंदात एलआयसीचे होल्डिंग व्हॅल्यू 3,907 कोटी रुपयांनी घसरून 35,166 रुपयांवर आले.

मूर्ती कुटुंबाचे किती नुकसान झाले?

रोहन मूर्ती यांच्या कंपनीतील स्टेकचे मूल्य 8,444.47 कोटी रुपये होते, जे आज 844 कोटी रुपयांनी कमी होऊन 7,600 कोटी रुपयांवर आले आहे.

ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी आणि नारायण मूर्ती यांच्या मुलीचा हिस्सा 1.07 टक्के आहे, ज्याची किंमत गुरुवारी 5,409.58 कोटी रुपये होती, जी आज 541 कोटी रुपयांनी कमी होऊन 4,868.66 कोटी रुपये झाली आहे.

नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा एन मूर्ती यांच्याकडे 4,797.69 कोटी रुपयांची 0.95 टक्के हिस्सेदारी होती, जी गुरुवारच्या अखेरीस 480 कोटी रुपयांनी घसरून 4,317.96 कोटी रुपयांवर आली.

इन्फोसिसमधील नारायण मूर्तीची 0.46 टक्के भागीदारी आता 2,080 कोटी रुपयांची आहे, जी गुरुवारच्या 2,311.41 कोटी रुपयांच्या तुलनेत 231.12 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

Infosys Narayana Murthy
Amul vs Nandini: अमूल-नंदिनी वादात राहुल गांधींची एंन्ट्री; ट्विट करत म्हणाले; कर्नाटकची...

SBI म्युच्युअल फंडचे मोठे नुकसान :

SBI म्युच्युअल फंडाने इन्फोसिसमधील गुंतवणुकीवर अंदाजे रु. 2,239.55 कोटी गमावले. त्यांच्याकडे आता इन्फोसिसचे 20,157 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत जे गुरुवारी 22,397 कोटी रुपये होते.

या घसरणीमुळे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडला रु. 1,226.79 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे इन्फोसिसचे 11,041 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.

सुधा गोपालकृष्णन यांना कंपनीतील 9,53,57,000 शेअर्स किंवा 2.61 टक्के शेअर्सवर 1,324 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे आता इन्फोसिसचे 11,917 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत जे मागील सत्रात 13,241 कोटी रुपये होते.

Infosys Narayana Murthy
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()