Innova Captab IPO Check price band, issue date, GMP and other details
Innova Captab IPO Check price band, issue date, GMP and other details Sakal

IPO News: पैसे तयार ठेवा! 21 डिसेंबरला खुला होणार 'या' फार्मा कंपनीचा आयपीओ, प्राइस बँड निश्चित

Innova Captab IPO: कंपनी आयपीओच्या माध्यमातून 570 कोटी उभारणार आहे
Published on

Innova Captab IPO: इंटिग्रेटेड फार्मास्युटिकल कंपनी इनोव्हा कॅपटॅबचा (Innova Captab) आयपीओ 21 डिसेंबरला खुला होतोय. या 570 कोटीच्या आयपीओसाठी त्यांनी 426-448 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओमध्ये 320 कोटीपर्यंतचे नवीन शेअर्स आणि 55.80 लाख इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) यांचा समावेश आहे.

मनोज कुमार लोहरीवाला, विनय कुमार लोहरीवाला आणि ज्ञान प्रकाश लोहरीवाला ऑफर फॉर सेलमध्ये (OFS) शेअर्स विकतील. आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेएम फायनांन्शियल हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी 144.40 कोटी कर्ज परतफेडीसाठी, 23.60 कोटी कंपनीच्या उपकंपनी युएमएलमध्ये (UML) गुंतवले जातील आणि 72 कोटी खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी खर्च केले जातील. याशिवाय, काही रक्कम जनरल कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च केली जाईल.

Innova Captab IPO Check price band, issue date, GMP and other details
Adani Group: गौतम अदानींचा मोठा निर्णय; गुजरातमध्ये चार नवीन कंपन्यांची केली स्थापना, काय आहे प्लॅन?

इश्यूचा अर्धा हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव ठेवण्यात आला आहे. 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि बाकी 15 टक्के गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी (NIB) राखीव आहेत. गुंतवणूकदार किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.

Innova Captab IPO Check price band, issue date, GMP and other details
LPG Price: 450 रुपयांपेक्षा स्वस्त LPG सिलेंडर? राजस्थानात घोषणा अन् संसदेत इन्कार.. भाजपचा युटर्न

इनोव्हा कॅपटॅब ही फार्मास्युटिकल कंपनी आहे ज्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, ड्रग डिस्ट्रीब्यूशन व मार्केटिंग शिवाय एक्सपोर्टही केले जाते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीचा कंसोलिडेटेड रेव्हेन्यू 15.72 टक्क्यांनी वाढून 926.38 कोटी झाला.

गेल्या आर्थिक वर्षात तो 800.53 कोटी होता. आर्थिक वर्ष 2022 मधील 63.95 कोटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा नफा 6.26% ने वाढून 67.95 कोटी झाला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.