Share Market Investment Tips: शुक्रवारी गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार बंद होता. तर गुरुवारी सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्समध्ये घसरण झाली. एफएमसीजी, पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस शेअर्समध्ये विक्री झाली.
निफ्टी 23,550 च्या खाली बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 110.64 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 77,580.31 वर बंद झाला आणि निफ्टी 26.35 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 23,532.70 वर बंद झाला.