Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Today: बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 167.71 अंकांनी अर्थात 0.21 टक्क्यांनी घसरून 81,467.10 वर बंद झाला आणि निफ्टी 31.20 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 24,982 वर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 167.71 अंकांनी अर्थात 0.21 टक्क्यांनी घसरून 81,467.10 वर बंद झाला आणि निफ्टी 31.20 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 24,982 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे आदित्य गग्गर म्हणाले की, बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात रझीस्टेंस लेवल म्हणजेच 25,200 ने खूप चांगली कामगिरी केली. दमदार सुरुवातीनंतर निफ्टी दिवसभरात हिरवागार राहिला.

पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या भागात निवडक हेवीवेट शेअर्सच्या मोठ्या घसरणीने निफ्टीला खाली खेचले. शेवटी, त्याने सर्व नफा गमावला आणि 31.20 अंकांच्या घसरणीसह 24,981.95 वर बंद झाला.

एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणतात की, निफ्टीने नफ्याने सुरुवात केली पण वाढ कायम ठेवण्यासाठी धडपडताना दिसत होते. शेवटी तो घसरणीसह बंद झाला.

वीकली चार्ट पर इंडेक्सवर 20DMA वर किंचित बंद झाला, जो दर्शवतो की शार्ट टर्म ट्रेंड पॉझिटीव्ह आहे आणि जोपर्यंत निफ्टी 24,940 च्या वर राहील तोपर्यंत हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. पण 24,940 च्या खाली 24,800/24,700 कडे करेक्शन ट्रिगर करु शकते. वरच्या बाजूने, 25,100 रजिस्टेंस म्हणून काम करू शकतात.

Share Market Today
Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

काल अमेरिकन बाजारात विक्रमी तेजी दिसून आली तर डाऊ 430 अंकांनी वाढला आणि विक्रमी पातळीवर बंद झाला. नॅस्डॅक 100 अंकांनी वाढून दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. GIFT निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह 25200 च्या जवळ आहे. सप्टेंबर CPI आज येण्यापूर्वी, डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते आणि जपानमधील निक्केई 150 अंकांनी वर होता.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • आयटीसी (ITC)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • ओएनजीसी (ONGC)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • हिंदूस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • ए यू बँक (AUBANK)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • फेडरल बँक FEDERALBNK

  • इंडस इंड बँक (INDUSINDBK)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

Share Market Today
Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.