Share Market Investment Tips: शुक्रवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्समध्ये घसरण झाली आणि निफ्टी 26,200 च्या खाली बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स सपाट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 264.27 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 85,571 अंकांवर आणि निफ्टी 37 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 26,179 अंकांवर बंद झाला.
मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले की, बेंचमार्क इंडेक्सनी सुरुवातीच्या व्यापारात नवीन सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर, यूएस चलनवाढीच्या आकडेवारीपुढे गुंतवणूकदार सावध झाले आणि बँकिंग, रियल्टी आणि पॉवर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली.
यामुळे दिवसभरातील नफ्याचा क्रम तुटला. कमकुवत आशियाई संकेतांमुळेही भावना कमी झाली. मात्र, मजबूत निधी प्रवाहामुळे बाजारात तेजी कायम राहिली. मेटल , ऑईल -गॅस आणि ऑटो शेअर्स मधील वाढीमुळे इंडेक्सना त्यांचे नुकसान कमी करण्यास वाव मिळाला.
पॉवर ग्रीड (POWERGRID)
भारती एअरटेल (BHARTIARTL )
एचडीएफसी बॅंक (HDFCBANK)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
हीरो मोट कॉर्प (HEROMOTOCO)
पीएनबी (PNB)
बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
फेडरल बँक (FEDERALBNK)
आयडीएफसी बँक (IDFCFIRSTB)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.