Share Market Investment Tips: भारतीय इक्विटी निर्देशांकांनी मागील सत्रातील नुकसान भरून काढले आणि निफ्टी मंगळवारी 24,200 च्या आसपास तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 694.39 अंकांनी अर्थात 0.88 टक्क्यांनी वाढून 79,476.63 वर आणि निफ्टी 197.20 अंकांनी म्हणजेच 0.82 टक्क्यांनी वाढून 24,192.50 वर बंद झाला.