Share Market Today: यूएस फेडने व्याजदरात केली कपात; भारतीय शेअर बाजारात काय होणार?

Share Market Today: फेडच्या निकालापूर्वी बुधवारी बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबाव दिसून आला. निफ्टी बँक वाढीसह बंद झाली.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: फेडच्या निकालापूर्वी बुधवारी बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबाव दिसून आला. निफ्टी बँक वाढीसह बंद झाली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 131 अंकांनी घसरून 82,948 वर आणि निफ्टी 41 अंकांनी घसरून 25,378 वर आला. निफ्टी बँक 562 अंकांनी वाढून 52,750 वर बंद झाला. मात्र, मिडकॅप 428 अंकांनी घसरून 59,753 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

बँकिंग शेअर्सच्या वाढीमुळे निफ्टीला 25,482 चा नवीन उच्चांक नोंदवण्यास मदत झाली पण मिड आणि स्मॉलकॅप्समधील घसरणीमुळे निफ्टीवर दबाव आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले.

उशीरा झालेल्या रिकव्हरीमुळे इंडेक्सला त्याचा काही तोटा कमी करण्यास मदत झाली. व्यवहाराच्या सत्राअखेर निफ्टी 41 अंकांच्या घसरणीसह 25,377.55 वर बंद झाला. बँकिंग इंडेक्स वगळता सर्व महत्त्वाचे इंडेक्स लाल रंगात बंद झाले.

FOMC सारखी मोठी घटना लक्षात घेऊन, दोन्ही बाजूंनी निफ्टीमध्ये मोठे चढ-उतार अपेक्षित आहेत. निफ्टीसाठी 25,580 वर रझिस्टंस आणि 25,250 वर सपोर्ट दिसत आहे.

जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. यूएस फेडने व्याजदरात 0.50% म्हणजेच 50 आधार अंकांची मोठी कपात केली आहे. फेड चेअरमन म्हणाले की, अर्थव्यवस्थेत मंदीची भीती नाही. यानंतर अमेरिकन बाजारांमध्ये नवीन जीवन उच्चांक दिसून आला. त्याचा परिणाम आज (19 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारांवर दिसून येईल.

Share Market Today
Fed Reserve: फेड 23 वर्षांचा इतिहास बदलणार का? भारतीय शेअर बाजारात होणार उलथापालथ; RBIच्या भूमिकेकडे लक्ष

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टीसीएस (TCS)

  • इन्फोसिस (INFY)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • विप्रो (WIPRO)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

Share Market Today
Diamond Sector: भारताचे हिरे क्षेत्र आर्थिक संकटात! 7,000 हून अधिक कंपन्या चिंतेत; काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.