Share Market Today: जागतिक बाजारात जोरदार तेजी; आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बुधवारी 2 दिवसांच्या वाढीनंतर बाजारात कंसोलिडेशन पाहायला मिळाले, त्यामुळे बाजार लाल रंगात बंद झाला. सर्वाधिक खरेदी कंझ्युमर गुड्स आणि पॉवर शेअर्समध्ये झाली. बाजारात मर्यादित व्यवहार दिसून आले.
Share Market Latest Update
Share Market Latest Update Sakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): बुधवारी 2 दिवसांच्या वाढीनंतर बाजारात कंसोलिडेशन पाहायला मिळाले, त्यामुळे बाजार लाल रंगात बंद झाला. सर्वाधिक खरेदी कंझ्युमर गुड्स आणि पॉवर शेअर्समध्ये झाली. बाजारात मर्यादित व्यवहार दिसून आले. सेन्सेक्स 118 अंकांनी घसरला आणि 72,987 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 17 अंकांनी घसरून 22,201 वर बंद झाला. बँक निफ्टी 172 अंकांनी घसरून 47,687 वर बंद झाला. मिडकॅप 483 अंकांनी वाढून 50708 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

तीन दिवसांच्या वाढीनंतर बाजाराने बुधवारी ब्रेक घेतला आणि फ्लॅट बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. सुरुवातीला तेजी होती पण काही मोठ्या शेअर्सवरील दबावामुळे निफ्टीला खाली ढकलले. निफ्टीबाबत सावध दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे.

22,300-22,400 च्या झोनमध्ये निफ्टीचा रझिस्टंस दिसून येतो. यावेळी, केवळ निवडक दर्जेदार स्टॉक्स निवडा असा सल्ला त्यांनी दिला. शिवाय स्थानिक घटकांव्यतिरिक्त, अमेरिकन बाजारांवर देखील बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

बँकिंग, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंगमुळे संपूर्ण व्यवहार सत्रात बाजार दबावाखाली राहिल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. शेवटी तो घसरणीसह बंद झाला. पण, रियल्टी, ऑईल अँड गॅस आणि पॉवर शेअर्समधील खरेदीमुळे घसरण कमी झाली.

यूएस फेडने दर कपातीला आणखी विलंब केल्याने आणि एफआयआयने केलेली विक्री यामुळे मार्केट सेंटीमेंट खराब झाले आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत आणि वाढत्या अनिश्चिततेमध्ये सावधगिरीचा मार्ग अवलंबत आहेत.

जागतिक बाजारपेठेतून मिळणारे संकेत चांगले आहेत. अमेरिकन बाजारांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठला आहे. चलनवाढीच्या आकडेवारीमुळे बाजार तेजीत आहे. अशा परिस्थितीत तीव्र चढ-उतारांचा सामना करणाऱ्या देशांतर्गत बाजारांना यातून साथ मिळते की नाही, हे पाहणे बाकी आहे. गिफ्ट निफ्टीमध्ये आज 100 अंकांची वाढ झाली आहे. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्येही जोरदार वाढ झाली.

Share Market Latest Update
PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • ए यू बँक (AUBANK)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • आयडीया (IDEA)

Share Market Latest Update
Nivea vs Ponds: 'निव्हिया' आणि 'पॉन्ड्स' कंपन्यांमध्ये भांडण; हायकोर्टाने कोणाच्या बाजूने दिला निकाल?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.