Share Market Today: चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी येणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: मंगळवारी निफ्टी दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 454.67 अंकांच्या अर्थात 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 72,186.09 वर आणि निफ्टी 167.50 अंकांच्या म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 21,939.20 वर बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: मंगळवारी निफ्टी दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 454.67 अंकांच्या अर्थात 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 72,186.09 वर आणि निफ्टी 167.50 अंकांच्या म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 21,939.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी वाढीसह उघडला आणि दिवसभरात तो सकारात्मक झोनमध्ये व्यवहार करताना 165 अंकांनी वाढून बंद झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टी अपवर्ड स्लोपिंग चॅनेलच्या रेंजमध्ये व्यापार करत आहे.

Share Market Investment Tips
PAN Aadhaar linking: सरकारची तिजोरी भरली! पॅन-आधार जोडणीतून वसूल केला 'इतक्या' कोटींचा दंड

21,730 चा अलीकडील स्विंग लो तुटत नाही तोपर्यंत, निफ्टीमध्ये 22,000 - 22,130 पर्यंत वाढ अपेक्षित आहे. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटरमध्ये पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर दिसत आहे, जे चांगले संकेत आहेत. अशाप्रकारे, प्राइस आणि मोमेंटम दोन्ही इंडिकेटर अपट्रेंड चालू राहतील.

कंसोलिडेशनच्या या कालावधीत स्टॉक विशिष्ट क्रिया आणि सेक्टर रोटेशन सुरू राहणे अपेक्षित आहे. निफ्टीला 21,730 - 21,700 वर महत्त्वाचा सपोर्ट आहे तर त्याला 22,100 - 22,130 च्या झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो.

Share Market Investment Tips
HDFC Bank: RBIने HDFC बँकेला दिली मान्यता; येस बँकेसह 'या' 6 बँकांमधील भागभांडवल खरेदी करणार

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • टीसीएस (TCS)

  • मारुती (MARUTI)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.