Share Market Today: काल शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर आज कशी असेल बाजाराची स्थिती? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सोमवारी आयटी आणि फार्मा वगळता सर्वच सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. त्यामुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 21,600च्या आसपास घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 523 अंकांनी अर्थात 0.73 टक्क्यांनी घसरला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी आयटी आणि फार्मा वगळता सर्वच सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. त्यामुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 21,600च्या आसपास घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 523 अंकांनी अर्थात 0.73 टक्क्यांनी घसरून 71,072.49 वर आणि निफ्टी 166.50 अंकांनी म्हणजेच 0.76 टक्क्यांनी घसरून 21,616 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

आवर्ली चार्टवर कंसोलिडेशन तोडल्यानंतर निफ्टी आणखी घसरला जे वाढत्या कमजोरीचे लक्षण असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले.

निफ्टी खालच्या पातळीवर असल्याचे डेली चार्टवरून स्पष्ट होते. मोमेंटम इंडिकेटरही मंदीचा आउटलूक देत असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत निफ्टी 21850 च्या खाली राहील तोपर्यंत विक्री सुरू राहू शकते. डाउनसाइड वर 21500 वर सपोर्ट आहे. (Investment Tips in marathi Which 10 shares perform today BPCL ONGC CONCOR 13 February 2024)

बँक निफ्टी इंडेक्सवर बिअर्सचे वर्चस्व कायम राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. वरच्या पातळीवर दबाव दिसून आला. 45000 च्या शॉर्ट टर्म सपोर्टच्या खाली बंद होणे हे मंदीचे लक्षण आहे. बँक निफ्टीसाठी 45100 वर रझिस्टंस आहे.

हा अडथळा पार केल्याने 45500 पातळीच्या दिशेने शॉर्ट-कव्हरिंग होऊ शकते. दुसरीकडे 44800 वर सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट टिकला नाही तर विक्रीचा दबाव 44000 अंकांच्या दिशेने वाढू शकतो.

Share Market Investment Tips
Paytm: पेटीएमला आणखी एक झटका! पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालकाने दिला राजीनामा; काय आहे प्रकरण?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • बीपीसीएल (BPCL)

  • ओएनजीसी (ONGC)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

Share Market Investment Tips
UPI Payment: आजपासून श्रीलंका, मॉरिशसमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.