Share Market Today: आज शेअर बाजारात खरेदी होणार की विक्री? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी मजबूत वाढीसह बंद झाला. बुधवारी निफ्टीने नवा उच्चांक गाठला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 354.45 अंकांच्या अर्थात 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 75,038.15 वर बंद झाला.
Share Market Today
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी मजबूत वाढीसह बंद झाला. बुधवारी निफ्टीने नवा उच्चांक गाठला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 354.45 अंकांच्या अर्थात 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 75,038.15 वर बंद झाला. तर निफ्टी 111.00 अंक म्हणजेच 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 22,753.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी बहुतेक साइडवेज राहिला कारण गुंतवणूकदारांचे लक्ष यूएस चलनवाढीच्या आकडेवारीवर होते असे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. या आकडेवारीचा यूएस फेडच्या दर कपातीच्या दृष्टिकोनावर परिणाम होऊ शकतो. आता निफ्टीसाठी 22,700-22,750 वर रेझिस्टन्स दिसून येत आहे.

तर वरच्या बाजूला, 22,600 वर सपोर्ट दिसत आहे. जर तो 22,750 च्या वर गेला तर निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 23,000 पर्यंत वाढू शकतो. मार्केट सध्या रेंजमध्ये असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत, घसरणीवर खरेदी आणि स्टॉप-लॉससह वाढीवर विक्री करणे ही एक चांगली रणनीती ठरू शकते असेही ते म्हणाले.

Share Market Today
Electoral Bonds: SBIने आरटीआय कायद्यांतर्गत निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास दिला नकार; काय आहे कारण?

गिफ्ट निफ्टीकडून मिळालेल्या चांगल्या संकेतांनंतर, भारतीय बाजारांनी दिवसाची सुरुवात 22,700 च्या आसपास मजबूत केली आणि दुपारच्या सत्रापर्यंत रेंज-बाउंड राहिल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले.

बँकिंग आणि एफएमसीजी काउंटरमधील वाढीच्या आधारावर, निफ्टी विकली एक्स्पायरी दिवशी 111.05 अंकांच्या वाढीसह 22,753.80 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. निफ्टी 50 इंडेक्सचा एकूण चार्ट सेटअप मजबूत आहे. खाली 22,530 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बीपीसीएल (BPCL)

  • आयटीसी (ITC)

  • कोटक बॅंक (KOTAKBANK)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • हिन्दुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

Share Market Today
Gold-Silver Vs Sensex-Nifty: सोन्या-चांदीची चमक सेन्सेक्स-निफ्टीवर भारी; काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()