Share Market Today: शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजारात खळबळ उडाली. एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 13.57 लाख कोटींचे नुकसान झाले. लहान आणि मध्यम शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप दोन्ही इंडेक्स 4.2% पेक्षा जास्त घसरले.
Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Investment Tips in marathi Which 10 shares perform todaySakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): बुधवारी शेअर बाजारात खळबळ उडाली. एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 13.57 लाख कोटींचे नुकसान झाले. लहान आणि मध्यम शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप दोन्ही इंडेक्स 4.2% पेक्षा जास्त घसरले.

बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्सही लाल रंगात राहिले. पॉवर, रियल्टी, युटिलिटी, टेलिकम्युनिकेशन, कमोडिटी आणि मेटल शेअर्सचे इंडेक्स 5% पेक्षा जास्त घसरून बंद झाले.

व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 906.07 अंकांनी अर्थात 1.23% घसरून 72,761.89 वर बंद झाला. दरम्यान, एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 338.00 अंक म्हणजेच 1.51% च्या घसरणीसह 21,997.70 वर बंद झाला.

का घसरला शेअर बाजार?

बुधवारच्या घसरणीमागील मुख्य कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील महागाई वाढली. वाढत्या महागाई दरामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याच्या प्रक्रियेस विलंब करू शकते, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.

याशिवाय शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या काही हवाला व्यापाऱ्यांशी निगडीत कंपन्यांबाबत ईडीने दिलेला इशारा आणि स्मॉल-मिडकॅप योजनांबाबत सेबीने दिलेला इशारा यामुळे बाजारात घसरण झाली आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • एनटीपीसी (NTPC)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • पीएफसी (PFC)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Pakistan: आधीच दारिद्र्य त्यात अर्धवट नोटांचा घोळ! पाकिस्तानमध्ये एकाच बाजूच्या नोटांची छपाई, व्हिडीओ व्हायरल

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.