Share Market Today: शेअर बाजारात आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष; कशी असेल बाजाराची स्थिती?

Share Market Investment Tips (Top Shares): तीन दिवस सुरु असलेली तेजी कालच्या म्हणजेच 10 जून सोमवारच्या सत्रात थांबलेली पाहायला मिळाली. मात्र स्मॉल आणि मिड कॅपमधील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांची चांदी केल्याचं पाहायला मिळालं.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: तीन दिवस सुरु असलेली तेजी कालच्या म्हणजेच 10 जून सोमवारच्या सत्रात थांबलेली पाहायला मिळाली. मात्र स्मॉल आणि मिड कॅपमधील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांची चांदी केल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 203 अंक घसरणीसह बंद झाला. मात्र BSE स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स तेजीसह बंद झाले.

सेक्टोरिअल इंडेक्समध्ये आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल आणि एनर्जी यामध्ये मंदी झालेली पाहायला मिळाली. इतर सर्व इंडेक्स तेजीत बंद झाले. सर्वात जास्त तेजी युटिलिटी आणि रियल्टी सेक्टरमध्ये पाहायला मिळाली.

आज 11 जून रोजी कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

शेअर खानचे टेक्निकल रिसर्च अनॅलिस्ट जतीन केडिया यांच्या मते, 10 जूनच्या सत्रात निफ्टी तेजीत ओपन झाला. मात्र दिवसभराच्या कन्सॉलिडेशननंतर पन्नास अंक घसरणीसह लाल रंगात बंद झाला. डेली चार्टवर निफ्टीने 23412 चा नवा रेकॉर्ड केला. तासाच्या मुमेंट इंडिकेटरने चार्टवर निगेटिव्ह क्रॉस ओव्हर दिला आहे, जो तेजी संपण्याचा संकेत देतो.

अशात बाजारात आणखी काही काळ कन्सॉलिडेशन होऊ शकतं, अशात निफ्टी पुढील काही सत्रात 23,160 ते 23,100 दरम्यान खाली घसरू शकतो. दरम्यान, निफ्टीने या लेव्हल्स तोडल्यास निफ्टी आणखी खाली म्हणजे 22,930 पर्यंत घसरू शकतो. तर वरच्या बाजूला 23,420 ते 23,500 च्या लेव्हलवर रेझिस्टन्स पाहायला मिळू शकतो.

Share Market Today
PM Modi Salary : पंतप्रधानांना देखील भरावा लागतो टॅक्स? कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री यांच्या पगारामध्ये नेमका फरक काय

आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

  • अल्ट्राटेक सिमेंट - ULTRACEMCO

  • ग्रासिम - GRASIM

  • हिरो मोटोकॉर्प - HEROMOTOCO

  • सिप्ला - CIPLA

  • पॉवरग्रीड - POWERGRID

  • युपीएल - UPL

  • ज्युबिलंट फूड्स - JUBLFOOD

  • पेज इंडस्ट्री - PAGEIND

  • व्होल्टास - VOLTAS

  • ए यु बँक - AUBANK

Share Market Today
Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची ऊर्जा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.