Share Market Today: अर्थसंकल्पानंतर आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: गुरुवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 106.81 अंकांनी अर्थात 0.15 टक्क्यांनी घसरून 71,645.30 वर बंद झाला
Investment Tips in marathi Which 10 shares perform today GRASIM LT VOLTAS 2 February 2024
Investment Tips in marathi Which 10 shares perform today GRASIM LT VOLTAS 2 February 2024 Sakal
Updated on

Share Market Investment Tips: गुरुवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 106.81 अंकांनी अर्थात 0.15 टक्क्यांनी घसरून 71,645.30 वर बंद झाला आणि निफ्टी 28.20 अंकांनी म्हणजेच 0.13 टक्क्यांनी घसरून 21,697.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अंतरिम बजेटच्या दिवशी, इंडेक्स 46000 च्या वर बंद झाल्यामुळे बँक निफ्टी बुल्सने ताकद दाखवल्याचे एलकेपी सिक्युरिटीज कुणाल शाह म्हणाले.

बाजाराचा कल सकारात्मक आहे. 45800 च्या स्तरावर बँक निफ्टीला मजबूत सपोर्ट आहे. त्याच वेळी, 46500 वर वरच्या बाजूस रझिस्टंस आहे. जर बँक निफ्टीने हा रझिस्टंस पार केला तर बाजारात तीव्र शॉर्ट कव्हरिंग दिसू शकते.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today GRASIM LT VOLTAS 2 February 2024
Budget 2024: बजेटमधून पदरी निराशाच! शेतकरी सन्मान निधी, टॅक्स 'जैसे थे'; ८वा वेतन आयोगही दूरच

निफ्टीने डेली चार्टवर एक स्मॉल बियरिश कँडल तयार केल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. पण बाजाराचा अंडरटोन अजूनही तेजीचा आहे. निफ्टीला 21,630 वर सपोर्ट आहे जो त्याचा 21 डिएमएही आहे. तर वरच्या बाजूने 21,840 वर रझिस्टंस दिसत आहे.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today GRASIM LT VOLTAS 2 February 2024
Budget 2024: 25,000 रुपयांपर्यंतची कर थकबाकी होणार माफ, अर्थसंकल्पात 1 कोटी करदात्यांना मिळणार दिलासा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ग्रासिम (GRASIM)

  • एल अँड टी (LT)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.