Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Investment Tips in marathi Which 10 shares perform todaySakal

Share Market Today: शेअर बाजारात आजही विक्री होणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सोमवारच्या अस्थिर सत्रात बेंचमार्क इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,150 च्या खाली घसरला आहे. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 352.67 अंकांनी अर्थात 0.48 टक्क्यांनी घसरून 72,790.13 वर आणि निफ्टी 90.70 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 22,122 वर आला.
Published on

Share Market Investment Tips In Marathi: सोमवारच्या अस्थिर सत्रात बेंचमार्क इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,150 च्या खाली घसरला आहे. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 352.67 अंकांनी अर्थात 0.48 टक्क्यांनी घसरून 72,790.13 वर आणि निफ्टी 90.70 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 22,122 वर आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय इक्विटीने आठवड्याची सुरुवात मंद गतीने केली आणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी इंडेक्सने गती गमावल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. त्यानंतर पुन्हा रिकव्हरीचा प्रयत्न दिसून आला.

पण इंडेक्स वरच्या स्तरावर टिकून राहू शकले नाहीत. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 90.65 अंकांच्या घसरणीसह 22,122.05 वर बंद झाला. इंडेक्सने आरएसआयमध्ये बियरीश डायव्हर्जंससह स्मॉल बियरीश कँडल तयार केली आहे. निफ्टी 22,050-22,250 च्या रेंजमध्ये फिरत आहे. या रेंजच्या दोन्ही बाजूला येणारा ब्रेकआउट बाजाराची दिशा स्पष्ट करेल.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Piyush Goyal : स्टार्टअपसाठी पुणे पसंतीचे

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ए यू बँक (AUBANK)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Business Summit : हे दशक भारताचेच,बाबा कल्याणी ; उत्पादन क्षेत्रातील ‘जीडीपी’ २५ टक्‍क्यांनी वाढेल

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.