Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कशी असेल बाजाराची स्थिती? काय सांगतात तज्ज्ञ

Share Market Investment Tips: शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात बाजारात तेजीचा कल दिसून आला. आयटी कंपन्यांच्या मजबूत वाढीमुळे निफ्टी 21,900 च्या आसपास पोहोचला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 847.27 अंकांच्या वाढीसह 72,568.45 अंकांवर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात बाजारात तेजीचा कल दिसून आला. आयटी कंपन्यांच्या मजबूत वाढीमुळे निफ्टी 21,900 च्या आसपास पोहोचला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 847.27 अंकांच्या अर्थात 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 72,568.45 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 247.30 अंकांच्या म्हणजेच 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 21,894.50 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने वाढीसह सुरुवात केली आणि दिवसभर सकारात्मक ट्रेंडसह व्यवहार केला आणि 260 अंकांच्या वाढीसह बंद झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली चार्टवर, निफ्टीने 21500 - 21850 च्या रेंजला मोडले. हा ब्रेकआउट नवीन तेजीचे संकेत देत आहे. लवकरच निफ्टी 22000-22300 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. निफ्टीला खाली 21750 - 21700 वर सपोर्ट दिसत आहे.

बँक निफ्टीने डेली चार्टवर हायर टॉप, हायर बॉटम बनवायला सुरुवात केली आहे. तेजीचा कल सुरू होण्याचे हे लक्षण आहे. बँक निफ्टीची वाढ 48000 पर्यंत चालू राहील अशी आशा आहे. जर इंडेक्सने ही पातळी ओलांडली तर तो 48500 पर्यंतचा स्तर पाहू शकतो.

Share Market Today
L&T Technology Services Ltd: एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भावः रु. ५४७२)

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • इन्फोसिस (INFY)

  • ओएनजीसी (ONGC)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • पीएफसी (PFC)

Share Market Today
Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तुफान तेजीत; काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.