Share Market Today: शेअर बाजारातील अस्थिरतेत 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: शुक्रवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स सपाट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 20.59 अंकांच्या अर्थात 0.03 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 74,248.22 वर बंद झाला
Share Market
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): शुक्रवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स सपाट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 20.59 अंकांच्या अर्थात 0.03 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 74,248.22 वर बंद झाला आणि निफ्टी 1 अंकाने घसरून 22,513.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची चाल?

शुक्रवारी संपूर्ण ट्रेडिंग सत्रात इंडेक्स साइडवेज राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. हे हँगिंग मॅन पॅटर्नच्या फॉर्मेशननंतर बाजारातील ट्रेंडमध्ये स्थिरता दर्शवते. डायरेक्शनल ब्रेकआउट किंवा पॅटर्न तयार न झाल्यामुळे निफ्टी साइडवेज राहू शकतो.

वरच्या बाजूने, 22650 वर रझिस्टंस दिसत आहे. जोपर्यंत निफ्टी 22650 च्या खाली राहील तोपर्यंत नवीन वाढ अपेक्षित नाही. खालच्या टोकाला 22300 वर सपोर्ट दिसत आहे. हा सपोर्ट कायम राखता आला नाही तर निफ्टी 22000-21900 च्या रेंजपर्यंत घसरू शकतो.

आरबीआयच्या धोरणानंतर बँक निफ्टीने आपली तेजी कायम ठेवली आणि तो 48,000 च्या महत्त्वाच्या पातळीच्या वर राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. यावरून असे दिसून येते की पुढील आठवड्यात तो नवीन सार्वकालिक उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

शक्यतो पुढच्या आठवड्यात 50,000 चा आकडाही गाठू शकतो. खालच्या स्ट्राइकवर बँक निफ्टीमध्ये पुट रायटिंग दिसून आले आहे ज्यामुळे 48,200-48,000 झोनमध्ये सपोर्ट निर्माण झाला आहे. याच्या वर राहिल्यास तेजीची शक्यता कायम आहे.

Share Market
Inflation: तूरडाळीचे भावही भिडणार गगनाला; स्वयंपाकघराचे ‘बजेट’ कोलमडणार?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ए यू बँक (AUBANK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • पीआय इंडस्टीज लिमिटेड (PIIND)

Share Market
MahaNirmiti : महानिर्मिती वीज कंपनीची विक्रमी कामगिरी! एकूण ६१,४३९ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती; औष्णिक वीजनिर्मितीत वाढ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.