Share Market Today: नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips (Top Shares): भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी सलग चौथ्या सत्रात वाढीसह बंद झाले आणि निफ्टी 24,950 वर पोहोचला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 285.94 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी वधारून 81,741.34 वर बंद झाला
Share Market Investment Tips
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी सलग चौथ्या सत्रात वाढीसह बंद झाले आणि निफ्टी 24,950 वर पोहोचला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 285.94 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी वधारून 81,741.34 वर बंद झाला आणि निफ्टी 93.90 अंकांनी म्हणजेच 0.38 टक्क्यांनी वधारून 24,951.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी दिवसभर तेजीत राहिला कारण पुट रायटर्स त्यांची पोझिशन 24,900 वर शिफ्ट करताना दिसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आवर्ली चार्टवर, इंडेक्सने कंसोलीडेशन ब्रेकआउट दिले आहे.

आरएसआय आवर्ली आणि डेली टाइम फ्रेम्सवर तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे. 25,000 च्या वर गेल्यास नवीन तेजीचा टप्पा सुरू होऊ शकतो. निफ्टीला 24,900 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी या पातळीच्या खाली घसरला तर तो 24,750 पर्यंत घसरू शकतो.

Share Market Investment Tips
best stocks to buy : कोणते शेअर ठरतील फायदेशीर?

फेड बैठकीपूर्वी बँक निफ्टी मर्यादित श्रेणीत राहिला. आतापर्यंत, इंडेक्स 21 ईएमएच्या खाली राहिला आहे. दुसरीकडे, डेली आरएसआयने तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केला आहे. 51,600 च्या वर गेल्यानंतर, निफ्टी बँक 52,000-52,200 पर्यंत वाढू शकतो. खालच्या टोकाला 51,200-51,000 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • मारुती (MARUTI)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • एनटीपीसी (NTPC)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • एमआरएफ (MRF)

Share Market Investment Tips
LPG Cylinder Price: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडर महागले, दिल्ली ते मुंबईचे नवे दर काय आहेत?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.