Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips (Top Shares): मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स 391.26 अंकांनी अर्थात 0.49 टक्क्यांनी वाढून 80,351.64 वर आणि निफ्टी 112.70 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 24,433.20 वर बंद झाला.
Investment Tips
Investment Tips in marathi Which 10 shares perform todaySakal
Updated on

Share Market Investment Tips: मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स 391.26 अंकांनी अर्थात 0.49 टक्क्यांनी वाढून 80,351.64 वर आणि निफ्टी 112.70 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 24,433.20 वर बंद झाला. शेअर बाजारात मंगळवारी चौफेर खरेदी दिसून आली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

इंडेक्सने मोठा हिरवा कँडल तयार करून पूर्वीचा उच्चांक ओलांडला आणि 24,520-24,600 पर्यंत पुढील रॅलीसाठी दार उघडल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. आता निफ्टीला 24,340 च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे.

निफ्टी आज सकारात्मक ट्रेंडने उघडला आणि दिवसभर तो तेजीत राहिल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या अखेरीस तो 97 अंकांच्या वाढीसह बंद झाला. डेली चार्टवर, निफ्टी 24400 च्या वर बंद झाला आहे.

जो दर्शवितो की पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. निफ्टीसाठी वरच्या बाजूचे पुढील टारगेट 24610 आहे जे शेवटच्या घसरणीची 161.82% फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हल आणि डेली अप्पर बोलिंजर बँड देखील आहे.

Investment Tips
Adani Group: आता अदानी समूह बनवणार जहाज! जगाला 30 वर्षांत 50,000हून अधिक व्यावसायिक जहाजांची गरज

बँक निफ्टीमध्ये मंगळवारी कंसोलिडेशन दिसून आल्याचे ते पुढे म्हणाले. हे 52000 - 53500 च्या मोठ्या रेंजमध्ये खालच्या टोकाच्या (52000) आसपास व्यापार करत आहे. अशा स्थितीत बँक निफ्टी लवकरच 53000 च्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • मारुती (MARUTI)

  • डिव्हिल लॅब (DIVISLAB)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • टायटन (TITAN)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

  • लुपिन (LUPIN)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • एमआरएफ (MRF)

  • आयडिया (IDEA)

Investment Tips
Demat Account : डी-मॅट खाती १६ कोटींवर; जून महिन्यात ४२ लाखांहून अधिकची भर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.