Share Market Investment Tips: जागतिक बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स-निफ्टीही सोमवारी 3 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप इंडेक्स 3.5 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 4 टक्क्यांनी घसरला.
व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 2,222.55 अंकांच्या अर्थात 2.74 टक्क्यांच्या घसरणीसह 78,759.40 वर बंद झाला आणि निफ्टी 662.10 अंकांच्या म्हणजेच 2.68 टक्क्यांच्या घसरणीसह 24,055.60 वर बंद झाला.
निफ्टी घसरणीसह उघडला आणि दिवसभर कमजोर राहिल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. तो सोमवारी 670 अंकांनी घसरून बंद झाला. निफ्टी बजेट दिवसाच्या 24075 च्या खालच्या पातळीवर गेला आहे.
निफ्टी 20-डे मूव्हिंग एव्हरेजच्या (24575) खाली निर्णायकपणे बंद झाला जो कमजोरीचे लक्षण आहे. निफ्टीची महत्त्वाची फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हल 23628 वर आहे. त्याच वेळी, त्याची 20 विक मूव्हिंग एव्हरेज 23280 आहे. वरच्या बाजूला यासाठी 24300 - 24350 वर रझिस्टंस दिसत आहे.
बँक निफ्टीनेही 50440 चा मागील स्विंग लो ओलांडला आहे आणि तो खाली बंद झाला आहे. ही घसरण कायम राहण्याची चिन्हे आहेत. या घसरणीमध्ये, ते 47650 - 47500 पर्यंत घसरू शकतो जिथे त्याची 200-डे मुव्हिंग एव्हरेज आहे. 20-विक मूव्हिंग एव्हरेज 49800 आहे, ज्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकेल. पण, 50400 - 50500 च्या दिशेने कोणतीही रॅली विक्री म्हणून पाहावी असेही ते म्हणाले.
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
ओएनजीसी (ONGC)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
टाटा स्टील (TATASTEEL)
हिन्दाल्को (HINDALCO)
भारत फोर्ज (BHARATFORG)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
आयडिया (IDEA)
पॉलीकॅब (POLYCAB)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.