Share Market Today: शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात कशी होणार? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips (Top Shares): शुक्रवारी शेवटच्या तासात बाजारात मोठी रिकव्हरी दिसून आली. बाजार खालच्या स्तरावरून सावरला आणि बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले.
Investment Tips
Investment Tips in marathi Which 10 shares perform todaySakal
Updated on

Share Market Investment Tips: शुक्रवारी शेवटच्या तासात बाजारात मोठी रिकव्हरी दिसून आली. बाजार खालच्या स्तरावरून सावरला आणि बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑईल-गॅस, एनर्जी आणि इन्फ्रा शेअर्समध्ये खरेदी झाली. पीएसई, फार्मा आणि एफएमसीजी इंडेक्सही वाढीसह बंद झाले.

बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. सेन्सेक्स 53 अंकांनी घसरला आणि 79,997 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 22 अंकांनी वाढून 24,324 वर बंद झाला. निफ्टी बँक 443 अंकांनी घसरून 52,660 वर बंद झाला. तर मिडकॅप 471 अंकांनी वाढून 57,089 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी इंडेक्समध्ये प्रचंड चढ-उतार दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. एचडीएफसी बँकेच्या घसरणीमुळे इंडेक्स घसरला. सध्या, बँक निफ्टी 53000-53200 वर असलेल्या रझिस्टंससह एका रेंजमध्ये अडकले आहे. या पातळीच्या आसपास बरेच कॉल रायटिंग पाहायला मिळाले.

त्याच वेळी, खाली 52300-52100 च्या झोनमध्ये सपोर्ट आहे. ट्रेंडिंग मूव्हसाठी, इंडेक्सला या रेंजच्या दोन्ही बाजूला निर्णायक ब्रेकआउट द्यावा लागेल. मात्र, या रेंजमध्येच तेजीचा कल दिसत आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही घसरणीचा उपयोग इंडेक्स खरेदी करण्यासाठी केला पाहिजे असेही ते म्हणाले.

निफ्टीची सुरुवात गॅप डाऊनने झाली, पण सुरुवातीच्या कमकुवतपणानंतर पुट रायटींगने जोरदार पुनरागमन केल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले.

शेवटच्या तासात निफ्टीमध्ये झालेल्या खरेदीमुळे तेजीचा कल दिसून आला. निफ्टी निर्णायकपणे 24200 च्या खाली जाईपर्यंत बाजारातील ही ताकद कायम राहण्याची आशा आहे. 24200 च्या खाली गेल्यास मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकते.

देशांतर्गत बाजारात शुक्रवारी संमिश्र ट्रेंडसह व्यवहार झाल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बँकिंग सेक्टरवरही दबाव दिसून आला. जूनच्या तिमाहीत मोठ्या बँकांच्या ठेवींमध्ये घट झाली होती, त्यामुळे चिंता आणखी वाढली. शुक्रवारी मिडकॅप आणि स्मॉल कॅपने चांगली कामगिरी केली.

Investment Tips
Veg Thali Price: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; शाकाहारी थाळीच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ, काय आहे कारण?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • सिप्ला (CIPLA)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

Investment Tips
ITR Filing: तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.