Share Market Today: आज कोणत्या शेअर्समध्ये कमाईची संधी? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips (Top Shares): भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 620.73 अंकांच्या अर्थात 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 78,674.25 वर आणि निफ्टी 147.50 अंकांच्या म्हणजेच 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 23,868.80 वर बंद झाला.
share market latest update
share market latest updateSakal
Updated on

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 620.73 अंकांच्या अर्थात 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 78,674.25 वर आणि निफ्टी 147.50 अंकांच्या म्हणजेच 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 23,868.80 वर बंद झाला.

जर आपण सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर बँक, ऑईल अँड गॅस,टेलिकॉम, मीडिया आणि एफएमसीजी 0.3-2 टक्क्यांनी वाढले, तर ऑटो, मेटल आणि रियल्टी 0.7-1.5 टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.30 टक्क्यांनी घसरला आहे. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

रिलायन्स आणि बँकिंग काउंटर्सच्या नेतृत्वाखालील या रॅलीमुळे सेन्सेक्स-निफ्टीला तेजीचा ट्रेंड चालू ठेवण्यास मदत झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी निफ्टी 147.50 अंकांच्या वाढीसह 23,868.80 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला.

सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे तर, सर्वात जास्त वाढ मीडियामध्ये दिसून आली, त्यानंतर एनर्जी. दुसरीकडे, मेटल आणि रियल्टीने त्यांची खराब कामगिरी सुरूच ठेवली.

खरेदीदारांना फक्त इंडेक्स स्टॉकमध्येच रस होता. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅपची कामगिरीही खराब झाली. इंडेक्स अपेक्षेनुसार कामगिरी करत आहे, पण आता प्रॉफीट बुकींग होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

बँक निफ्टी इंडेक्सने तेजी कायम ठेवल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. इंडेक्सचा अंडरटोन तेजीचा राहिला. 52,500-52,400 च्या पातळीवर बँक निफ्टीला तात्काळ सपोर्ट आहे. बँक निफ्टीच्या घसरणीवर खरेदीचे धोरण अवलंबले पाहिजे, असे कुणाल शाह यांचे म्हणणे आहे. इंडेक्समधील खालच्या पातळीवर आक्रमक पुट रायटींग पाहायला मिळाले जे मजबूत सपोर्टचे संकेत आहे.

share market latest update
Nikesh Arora : भारतीयांचा डंका! निकेश अरोरा सर्वाधिक वेतन घेणारे CEO ; नडेला, झुकेरबर्ग आणि पिचाई  यांनाही टाकले मागे

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • रिलायन्स (RELIANCE)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • ग्रासिम (GRASIM)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • आयडिया (IDEA)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

  • ए यू बँक (AUBANK)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

share market latest update
Quant MF: क्वांट म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेत; SIP सुरू ठेवावी की फंडातून बाहेर पडावे? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.