Share Market Today: आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम बाजारावर होणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात फ्लॅट बंद झाला. आरबीआयच्या धोरणापुढे बाजार सावध दिसत आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 34.09 अंकांनी अर्थात 0.05 टक्क्यांनी घसरून 72,152.00 वर बंद झाला
Investment Tips in marathi Which 10 shares perform today SBIN PFC VOLTAS 8 February 2024
Investment Tips in marathi Which 10 shares perform today SBIN PFC VOLTAS 8 February 2024 Sakal
Updated on

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात फ्लॅट बंद झाला. आरबीआयच्या धोरणापुढे बाजार सावध दिसत आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 34.09 अंकांनी अर्थात 0.05 टक्क्यांनी घसरून 72,152.00 वर बंद झाला आणि निफ्टी 1.10 अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 21,930.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

डेली चार्टवर निफ्टी गेल्या काही आठवड्यांपासून एका रेंजमध्ये व्यवहार करत आहे. 22000 - 22050 ची लेव्हल रझिस्टंस म्हणून काम करत आहे, तर 21800 - 21900 च्या रेंजमधील आवर्ली मुव्हींग एव्हरेज सपोर्टचे काम करत आहे.

वर किंवा खाली एक स्पष्ट दिशा होण्यासाठी, निफ्टीला या लहान रेंजच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. असे होईपर्यंत, स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आणि सेक्टर रोटेशन चालू राहण्याची शक्यता आहे. निफ्टीला 21730 - 21680 वर सपोर्ट आहे तर 22000 - 22053 च्या झोनमध्ये रझिस्टंस आहे.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today SBIN PFC VOLTAS 8 February 2024
BharatPe: पेटीएमनंतर आता 'BharatPe' संकटात? सरकारने पाठवली नोटीस, काय आहे कारण?

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बँक निफ्टी हिरव्या रंगात बंद झाला. पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये रिट्रेसमेंट 46300-46500 पर्यंत चालू राहील अशी आशा आहे. यासाठी 45500-45400 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पीएफसी (PFC)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ग्रासिम (GRASIM)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today SBIN PFC VOLTAS 8 February 2024
PM Modi: LIC बद्दल अफवा कोणी पसरवल्या? एअर इंडिया कोणी बुडवली? BSNL, Maruti बद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.