Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Investment Tips (Top Shares): भारतीय इक्विटी इंडेक्स बुधवारी वाढीसह बंद झाले. या ट्रेडिंग सत्रात मीडिया वगळता सर्व सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली आणि निफ्टी 24,250 च्या वर बंद झाला.
Share Market Today
Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: भारतीय इक्विटी इंडेक्स बुधवारी वाढीसह बंद झाले. या ट्रेडिंग सत्रात मीडिया वगळता सर्व सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली आणि निफ्टी 24,250 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 545.35 अंकांच्या अर्थात 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 79,986.80 वर आणि निफ्टी 162.70 अंकांच्या म्हणजेच 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 24,286.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय शेअर बाजारातील बुधवारच्या ट्रेडिंग सत्राची सुरुवात 24,290 च्या मजबूत उच्चांकाने झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. पण फॉलो-थ्रू खरेदीच्या अभावामुळे, निफ्टी व्यापार सत्राच्या शेवटी 162.65 अंकांच्या वाढीसह 24,286.50 वर बंद झाला. मीडिया वगळता इतर सर्व सेक्टर्सने दिवसाचा शेवट हिरवागार केला.

बँक निफ्टी टॉप परफॉर्मर राहिला. त्यानंतर मेटल आणि पीएसयू बँकांमध्येही चांगली वाढ झाली. निर्देशांकाने अपेक्षेनुसार कामगिरी केली, पण विक्रमी स्तरावर ड्रॅगनफ्लाय डोझी कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या निर्मितीला विराम किंवा कंसोलीडेशन दाखवत आहे. अशा परिस्थितीत निफ्टी 24,200 च्या खाली घसरल्यास ही घसरण 24,130 पर्यंत वाढू शकते.

बँक निफ्टी इंडेक्समध्ये मजबूती होती असे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. बँक निफ्टीने क्लोजिंग बेसिसवर 53000 चा रझिस्टंस पार केला. डेली चार्टवर हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशनसह इंडेक्स मजबूत अपट्रेंडमध्ये व्यापार करत आहे. आता बँक निफ्टीला 52500 वर सपोर्ट आहे. या सपोर्टकडे कोणतीही घसरण ही नवीन लाँग पोझिशन्स सुरू करण्याची चांगली संधी असेल असेही ते म्हणाले.

Share Market Today
Japan New Note: 20 वर्षांनंतर जपानने घेतला मोठा निर्णय; देशाची सर्वत्र होतेय चर्चा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • आयडिया (IDEA)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

Share Market Today
Koo Shut Down: भारतीय ट्विटर 'कु'ला लागली घरघर; लवकरच बंद होणार ॲप, काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.