Share Market Today: शेअर बाजारात पैसे कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: मंगळवारच्या म्हणजेच दोन एप्रिलच्या शेअर बाजाराच्या सत्रात रियल्टी, मेटल्स, ऑइल आणि गॅस, मीडिया, पॉवर आणि ऑटो शेअर्स तेजीसह बंद झाले. आयटी आणि टेलिकॉम निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरलेले पाहायला मिळाले.
Investment Tips in marathi Which 10 shares perform today TATACONSUM BPCL VOLTAS 3 April 2024
Investment Tips in marathi Which 10 shares perform today TATACONSUM BPCL VOLTAS 3 April 2024Sakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारच्या म्हणजेच दोन एप्रिलच्या शेअर बाजाराच्या सत्रात रियल्टी, मेटल्स, ऑइल आणि गॅस, मीडिया, पॉवर आणि ऑटो शेअर्स तेजीसह बंद झाले. आयटी आणि टेलिकॉम निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरलेले पाहायला मिळाले. सुरुवातीच्या घसरणीनंतर, बाजारात मेटल आणि ऑटो शेअर्सच्या नेतृत्वाखाली तेजी पाहायला मिळाली, ज्यामुळे निर्देशांकाला त्याचे बहुतेक नुकसान भरून काढण्यास मदत झाली.

मंगळवारी शेअर बाजार हलक्या घसरणीसह बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 110.64 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 73,903.91 वर आणि निफ्टी 8.70 अंकांनी म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 22,453.30 वर बंद झाला. बँक निफ्टी 33 अंकांनी घसरून 47,545 वर बंद झाला.

त्याचवेळी मिडकॅप 567 अंक वधारून 49,479 वर बंद झाला. दोन तारखेच्या सत्रात 2686 शेअर्स वधारले तर 1015 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 111 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्समध्ये विक्री झाली. त्याचवेळी निफ्टीचे 50 शेअर्सपैकी 28 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बँक निफ्टीच्या 12 पैकी 9 शेअर्समध्ये खरेदी झाली.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today TATACONSUM BPCL VOLTAS 3 April 2024
Vistara Airlines: विस्तारा एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या; उड्डाण रद्द केल्याने सरकारने विचारले प्रश्न, काय आहे प्रकरण?

आज कशी असेल बाजाराची चाल?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर सांगतात की, निफ्टीने डेली चार्टवर आणखी एक डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. जर निर्देशांकाने 22,500 च्या वर मजबुती दाखवली, तर निफ्टी 22,640 च्या दिशेने जाताना पाहायला मिळू शकतो, मात्र बाजारात विक्री झाल्यास निफ्टीसाठी 22,340 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळतोय.

आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

  • टाटा कन्झ्युमर (TATACONSUM)

  • महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

  • बीपीसीएल (BPCL)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • अदानीपोर्ट्स (ADANIPORTS)

  • गोदरेज प्रॉपर्टी (GODREJPROP)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today TATACONSUM BPCL VOLTAS 3 April 2024
2000 Rupee Notes: दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत; ८,२०२ कोटी रुपयांच्या नोटा येणे बाकी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.