Share Market Today: शेअर बाजारात विक्रीचे संकेत? आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स पॉझिटीव्ह नोटवर बंद झाले आणि निफ्टी 22,050च्या आसपास घसरला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 104.99 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 72,748.42 वर बंद झाला.
Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Investment Tips in marathi Which 10 shares perform todaySakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स पॉझिटीव्ह नोटवर बंद झाले आणि निफ्टी 22,050 च्या आसपास घसरला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 104.99 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 72,748.42 वर आणि निफ्टी 32.40 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 22,055.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली, मात्र, दिवसभरात तो सावरला आणि 32 अंकांच्या वाढीसह बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. दिवसभरात, निफ्टीने 21900 - 21850 चा सपोर्ट झोन राखण्यात यश मिळवले. यात 40-डे एव्हरेज आणि मागील स्विंग लोच्या स्वरूपात सपोर्ट कायम आहे.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Adani Group: अमेरिकन तपास यंत्रणांच्या रडारवर अदानी समूह; कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण?

गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांसाठी निफ्टी 21900 - 22200 च्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत आहे. ही रेंज तुटल्यावरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल. जोपर्यंत निफ्टी हा सपोर्ट कायम ठेवण्यात यशस्वी होतो तोपर्यंत त्यात वाढ होण्याची आशा आहे. आता निफ्टीसाठी 22215 - 22250 वर रझिस्टंस आणि 21900 - 21860 वर सपोर्ट दिसत आहे.

दुसरीकडे, बँक निफ्टी सोमवारी सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह बंद झाला. तो इंट्राडे लो (46022) वरून झपाट्याने रिकव्हर झाला. या प्रक्रियेत तो 20 वीक एव्हरेजवर कायम आहे, बँक निफ्टी वाढेल अशी आशा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • युनायटेड फॉस्फोरम लिमिटेड (UPL)

  • इन्फोसिस (INFY)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • टीसीएस (TCS)

  • टायटन (TITAN)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एमआरएफ (MRF)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Narayana Murthy: 4 महिन्यांचा नातू बनला 240 कोटींचा मालक; नारायण मूर्तींनी गिफ्ट केले इन्फोसिसचे शेअर्स

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.