Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? कसे आहेत जागतिक संकेत?
Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात सलग 5 व्या दिवशी वाढ दिसून आली. तिसर्या तिमाहीतील चांगले निकाल आणि सर्व सेक्टरमधील वाढीच्या जोरावर सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकावर बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स 759.49 अंकांनी अर्थात 1.05 टक्क्यांनी वाढून 73,327.94 वर आणि निफ्टी 203.00 अंकांनी म्हणजेच 0.93 टक्क्यांनी वाढून 22,097.50 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
निफ्टीची सुरुवात वाढीसह झाली आणि शेवटी तो 203 अंकांच्या वाढीसह बंद झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. आयटी सेक्टरमधील तेजीमुळे ही वाढ दिसून आली.
बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आणि फार्मा शेअर्समधील वाढही या तेजीला कारणीभूत ठरली. अशा परिस्थितीत, सेक्टर रोटेशन सुरू राहण्याची आशा करू शकतो, ज्यामुळे निफ्टीमध्ये आणखी तेजी येऊ शकते. ऑटो आणि एफएमसीजी सेक्टर्समधील शेअर्सदेखील सध्याच्या तेजीला हातभार लावतील अशी अपेक्षा आहे.
निफ्टीसाठी शॉर्ट टर्म टारगेट 22350 - 22500 वर आहे. ओवरऑल ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. 21900 - 21850 च्या सपोर्ट झोनमध्ये घसरण ही खरेदी संधी म्हणून वापरली जावी असा सल्लाही त्यांनी दिला.
आज बाजारात नरमाई दिसून येईल. कारण जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. GIFT निफ्टी थोड्या घसरणीसह 22,100 च्या खाली व्यवहार करत आहे. आशियाई आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये नरमाईची आहे.
बँक निफ्टीने डेली चार्टवर हायर टॉप आणि हायर बॉटम बनवण्यास सुरुवात केली आहे, जे तेजीचे संकेत आहेत. बँक निफ्टी 48000 अंकांच्या वर बंद करण्यात यशस्वी झाला, शिवाय 20-डे मूव्हिंग एव्हरेज देखील तेजीचे संकेत देत आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी बँक 48650 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्याहून अधिक ते 50000 पर्यंत वाढू शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
विप्रो (WIPRO)
ओएनजीसी (ONGC)
एचसीएल टेक (HCLTECH)
इन्फोसिस (INFY)
एचडीएफसी बँक (HDFCBANK)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
पॉलिकॅब (POLYCAB)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
पेज इंडिया (PAGEIND)
पीएफसी (PFC)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.