Share Market Today: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

Share Market Investment Tips: शुक्रवारी वर्षाच्या शेवटच्या सत्रात बाजार एका रेंजमध्ये राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 170.12 अंकांनी अर्थात 0.23 टक्क्यांनी घसरून 72,240.26 वर आणि निफ्टी 47.30 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 21,731.40 वर बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: शुक्रवारी वर्षाच्या शेवटच्या सत्रात बाजार एका रेंजमध्ये राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 170.12 अंकांनी अर्थात 0.23 टक्क्यांनी घसरून 72,240.26 वर आणि निफ्टी 47.30 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 21,731.40 वर बंद झाला. मिडकॅप 366 अंकांनी वाढून 46,182 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. कॅलेंडर वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजाराने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि किंचित घसरणीसह बंद झाला. सुरुवातीच्या घसरणीनंतर, निफ्टी एका रेंजमध्ये फिरत राहिला आणि शेवटी 21,731.40 च्या पातळीवर बंद झाला.

दरम्यान, सेक्टरल आघाडीवर संमिश्र ट्रेंडने व्यापाऱ्यांना व्यस्त ठेवले. ऑटो आणि एफएमसीजीमध्ये वाढ झाली, तर एनर्जी, आयटी आणि बँकिंगमध्ये काही प्रॉफिट बुकिंग दिसून आले. याशिवाय लघु आणि मध्यम शेअर्सच्या वाढीमुळे दबाव कमी झाला.

आता आपण इंडेक्समध्ये आणखी कंसोलिडेशन पाहू शकतो. नुकत्याच झालेल्या वाढीनंतर हे कंसोलिडेशन बाजारासाठी हेल्दी ठरेल. कंसोलीडेशनदरम्यान कोणतीही घसरण झाल्यास, निफ्टी 21,300-21,500 झोनमध्ये राहील अशी आशा आहे.

या कालावधीत 22,150 रुपयांचे पोझिशनल टारगेट पाहायला मिळू शकते. नवीन वर्षात गुंतवणूकदारांना केवळ निवडक शेअर्सवर, विशेषतः इंडेक्स दिग्गजांवर फोकस करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Share Market Investment Tips
UPI : ‘यूपीआय’ अधिक ग्राहकाभिमुख

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • इन्फोसिस (INFY)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ज्यूबिलंट फूड (JUBLFOOD)

  • पीएफसी (PFC)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

Share Market Investment Tips
अलविदा २०२३, वेलकम २०२४ !

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.