Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्यासाठी कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Share Market Investment Tips: शेअर बाजारातील तेजीचा कल कायम राहण्याचे संकेत. बुधवारच्या घसरणीनंतर गुरुवारी बाजारात मोठी रिकव्हरी दिसून आली. या रिकव्हरीमुळे बाजार खालच्या पातळीवरून सावरला आणि तेजीसह बंद झाला.
Share Market Investment
Share Market Investment Sakal
Updated on

Share Market Investment Tips: बुधवारच्या घसरणीनंतर गुरुवारी बाजारात मोठी रिकव्हरी दिसून आली. या रिकव्हरीमुळे बाजार खालच्या पातळीवरून सावरला आणि तेजीसह बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 359 अंकांनी वाढून 70,865 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 105 अंकांनी वाढून 21,255 वर बंद झाला. निफ्टी बँक 395 अंकांनी वाढून 47,840 वर बंद झाला. तर मिडकॅप 743 अंकांनी वाढून 44,768 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

आता इंडेक्समध्ये कंसोलिडेशन अपेक्षित असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. ट्रेडर्ससाठी संधीची कमतरता नसेल, हे लक्षात घेऊन त्यांनी व्यापार करावा असेही ते म्हणाले. तुलनेने मजबूत असलेल्या सेक्टर्सना प्राधान्य दिले पाहिजे.

देशांतर्गत घटकांव्यतिरिक्त, यूएस बाजारांची हालचाल बाजारांची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. अमेरिकेतून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा असेही त्यांनी सांगितले.

निफ्टीने अलीकडे चांगली ताकद दाखवल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. निफ्टीने 21000 च्या महत्त्वाच्या सपोर्टने जोरदार पुनरागमन केले आहे. बाजारातील तेजीचा कल कायम राहण्याचे हे लक्षण आहे. निफ्टी त्याच्या 10 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर बंद झाला जे एक सकारात्मक चिन्ह आहे. आता निफ्टीला 21000 वर सपोर्ट आणि 21300 वर रझिस्टंस दिसत आहे.

Share Market Investment
Inflation: महागाईच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर; सर्वाधिक फटका कोणत्या देशाला?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • बीपीसीएल (BPCL)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • गोदरेज प्रॉपर्टी (GODREJPROP)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पीएफसी (PFC)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

Share Market Investment
Adani Group: अदानी कुटुंब 'या' व्यवसायात करणार 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक! शेअर्समध्ये तुफान वाढ

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()