ACMC Solar Holdings : सौरऊर्जा कंपनी एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या (ACME Solar Holdings) शेअर्सची नुकतीच लिस्टिंग झाली, पण या आयपीओने गुंतवणूकदारांची निराशा केली. .हा शेअर बीएसईवर आयपीओच्या अप्पर प्राइस बँड 289 रुपयांपेक्षा 10.38 टक्के डिस्काउंटसह 259 रुपये आणिा एनएसईनर 13 टक्के डिस्काउंटसह 251 रुपयांवर लिस्ट झाला. शेअर एनएसईवर आयपीओ किमतीपेक्षा 11.7 टक्क्यांनी आणि ओपनिंग प्राईसपासून 1.65 टक्क्यांनी खाली 255.15 रुपयांवर स्थिरावला.कंपनीचा 2,900 कोटीचा पब्लिक इश्यू 6 नोव्हेंबरला उघडला आणि 8 नोव्हेंबरला बंद झाला. या दरम्यान त्याला जवळपास 3 पट सबस्क्रिप्शन मिळाले. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव भाग 3.72 वेळा, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 1.02 वेळा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 3.25 वेळा आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव भाग 1.8 पट भरला गेला..आयपीओमध्ये, 2,395 कोटीचे 8.29 कोटी नवीन शेअर्स जारी करण्यात आले होते, तसेच 505 कोटीचे 1.75 कोटी शेअर्स विक्रीसाठी ऑफर करण्यात आले होते. कंपनी नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या पैशाचा वापर तिच्या सब्सिडिअरीजच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करेल.एसीएमसी सोलर होल्डिंग्सचे प्रमोटर्स ममता उपाध्याय, मनोज कुमार उपाध्याय, एसीएमसी क्लीनटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, एमकेयू होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि उपाध्याय फॅमिली ट्रस्ट आहेत. कंपनीने आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 1,300.50 कोटी उभे केले..2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 7.71% ने वाढून 1,466.27 कोटी झाला आहे. दरम्यान, निव्वळ नफा 697.78 कोटींवर पोहोचला, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 22084.28% ची मोठी वाढ आहे. एप्रिल-जून 2024 तिमाहीत महसूल 340.01 कोटी होता आणि निव्वळ नफा 1.39 कोटी होता.नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.