IPO Alert: गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी! सेबीला आयपीओसाठी एकाच दिवसात 13 कंपन्यांचे अर्ज

IPO Fever Continues: तुम्हीही IPO मधून कमाई करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतातील आयपीओ बाजार वेगाने विकसित होत आहे. बाजार नियंत्रक सेबीकडे दररोज कंपन्यांकडून अर्ज येत आहेत. सध्या भारतीय शेअर बाजारात आयपीओद्वारे निधी उभारण्याची शर्यत सुरू आहे.
IPO Fever Continues
IPO Fever ContinuesSakal
Updated on

IPO Fever Continues: तुम्हीही IPO मधून कमाई करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतातील आयपीओ बाजार वेगाने विकसित होत आहे. बाजार नियंत्रक सेबीकडे दररोज कंपन्यांकडून अर्ज येत आहेत. सध्या भारतीय शेअर बाजारात आयपीओद्वारे निधी उभारण्याची शर्यत सुरू आहे.

सोमवारी 13 कंपन्यांनी सेबीकडे आयपीओसाठी त्यांची कागदपत्रे सादर केली. सेबीने या अर्जांना मान्यता दिल्यास या कंपन्या सुमारे 8,000 कोटी रुपये उभारण्यास तयार होऊ शकतात.

या कंपन्या विविध क्षेत्रांशी निगडीत आहेत, त्यापैकी अनेक नवीन शेअर्स जारी करण्याचा तसेच त्यांचे विद्यमान शेअर्स विकण्याचा प्रस्ताव देत आहेत. यामध्ये विक्रम सोलर, आदित्य इन्फोटेक आणि वरिंद्र कन्स्ट्रक्शन या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

याशिवाय अजॅक्स इंजिनीअरिंग, राही इन्फ्राटेक, विक्रन इंजिनीअरिंग, मिडवेस्ट, विनी कॉर्पोरेशन, संभव स्टील ट्यूब्स, जॅरो इन्स्टिट्यूट, ऑल टाइम प्लास्टिक्स आणि स्कोडा ट्युब्स या कंपन्यांनीही कागदपत्रे दाखल केली आहेत.

IPO Fever Continues
Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

तज्ज्ञांच्या मते, हा कल भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवतो. या वर्षी आतापर्यंत 62 कंपन्यांनी त्यांच्या IPO द्वारे 64,000 कोटी रुपये उभे केले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% जास्त आहे.

बँकर्सचे म्हणणे आहे की पुढील काही महिन्यांत Hyundai Motor India, Swiggy आणि NTPC ग्रीन एनर्जी सारख्या कंपन्या IPO च्या माध्यमातून 60,000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत.

कोण किती निधी उभारणार?

विक्रम सोलरचा आयपीओ 1,500 कोटी रुपयांचा असेल, तर आदित्य इन्फोटेकची 1,300 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. वरिंद्र कन्स्ट्रक्शनचा IPO 1,200 कोटी रुपयांचा असेल. विक्रन इंजिनिअरिंगचा प्रस्तावित IPO 1000 कोटी रुपयांचा असेल. कोलकतास्थित राही इन्फ्राटेकची आयपीओद्वारे 420 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

IPO Fever Continues
RBI MPC New Member: तुमचा EMI ठरवणाऱ्या RBIच्या समितीतील तीन नवे चेहरे कोण? व्याजदर कमी होणार का?

संभव स्टील ट्यूब्सचा IPO 440 कोटी रुपयांचा असेल. जॅरो इन्स्टिट्यूटचा आयपीओ 570 कोटी रुपयांचा असेल. ऑल टाइम प्लास्टिकचा प्रस्तावित IPO 350 कोटी रुपयांचा असेल. त्याच वेळी स्कोडा ट्यूब्सचा IPO 275 कोटी रुपयांचा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.