Upcoming IPO: गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! 6 महिन्यात येणार 71 कंपन्यांचे IPO, पहा कंपन्यांची यादी

Upcoming IPO: सेबीने 41 कंपन्यांना आयपीओ लाँच करण्यासाठी मान्यता दिली आहे
Upcoming IPO
Upcoming IPOSakal
Updated on

Upcoming IPO: 2023 मध्ये अनेक कंपन्यांनी आयपीओ आणले आहेत. या वर्षातील उरलेल्या महिन्यांमध्ये 70 हून अधिक IPO लाँचसाठी रांगेत असल्याने गुंतवणूकदारांना कमाईच्या मोठ्या संधी मिळणार आहेत. यामध्ये टाटा समूहातील कंपन्यांचे आयपीओही रांगेत आहेत.

बाजारातून 1.90 कोटी रुपये उभारण्याची तयारी

प्राइम मार्केट ट्रॅकिंग कंपनी प्राइम डेटाबेसच्या अहवालानुसार, सुमारे 71 कंपन्या 2023-24 या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात त्यांचे IPO लाँच करण्याची योजना आखत आहेत. या माध्यमातून बाजारातून 1.90 लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात 31 जुलैपर्यंत, 15 कंपन्यांनी त्यांचे IPO लाँच केले आहेत आणि बाजारातून 21,089 कोटी रुपये उभे केले आहेत. आता दुसऱ्या सहामाहीतही गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळणार आहेत.

Upcoming IPO
Gautam Adani: अदानींवरील संकट आणखी गडद, पुन्हा विकले 8,700 कोटींचे शेअर्स, काय आहे कारण?

41 कंपन्यांना मिळाली मंजुरी

आतापर्यंत, बाजार नियामक सेबीने सुमारे 41 कंपन्यांना आयपीओ लाँच करण्यासाठी मान्यता दिली आहे, तर सुमारे 30 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणण्यासाठी बाजार नियामकाकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

ज्या कंपन्यांना त्यांचा IPO लाँच करण्यासाठी नियामक मान्यता मिळाली आहे ते बाजारातून सुमारे 50,900 कोटी रुपये उभे करू शकतात.

अशा परिस्थितीत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आतापर्यंतचे बहुतेक IPO लहान आहेत, परंतु भविष्यात मोठ्या कंपन्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी देतील.

Upcoming IPO
IRFC Shares: मोदी सरकार 'या' कंपनीतील हिस्सा विकणार, मिळणार 7,600 कोटी रुपये

टाटांच्या दोन कंपन्यांचे IPO येणार

सेबीने आयपीओ लाँच करण्यासाठी मान्यता दिलेल्या आयपीओमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये टाटा समूहाच्या दोन कंपन्या आहेत.

यापैकी पहिली कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आहे, जी सुमारे 4,000 कोटींचा IPO लाँच करेल, तर दुसरी कंपनी टाटा प्ले लिमिटेड आहे, ज्याचा IPO आकार 2,500 कोटी असू शकतो.

या यादीत इतर मोठी नावे समाविष्ट आहेत, त्यापैकी सर्वात वर EbixCash Limited आहे. कंपनी बाजारातून सुमारे 6,000 कोटी रुपये उभे करू शकते.

Upcoming IPO
ITR Filing: देशात महाराष्ट्र नंबर 1, आयकर रिटर्न भरण्यात 'या' राज्यांचा सर्वात जास्त वाटा

'या' कंपन्यांचे आयपीओही रांगेत

टाटा समूहाच्या कंपन्यांव्यतिरिक्त Navi Technologies Limited यांचा समावेश आहे, ज्यांचा IPO आकार रु 3,300 कोटी आहे, Indegene Limited ज्यांचा IPO आकार रु 3,200 कोटी आहे.

ऑगस्टच्या उरलेल्या दिवसांत येणारे IPO पाहता गुंतवणूकदारांना या महिन्यात एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज (22ऑगस्ट), पिरॅमिड टेक्नोप्लास्ट (18 ऑगस्ट) मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.