IPO Open : लवकरच दीपक बिल्डर्स आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ ; सेबीकडे पेपर्स दाखल...

इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपनी दीपक बिल्डर्स आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (Deepak Builders & Engineers) लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.
IPO Open
IPO Opensakal
Updated on

इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपनी दीपक बिल्डर्स आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (Deepak Builders & Engineers) लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. चालू आर्थिक वर्षात (2024-25) आयपीओसाठी कागदपत्रे सादर करणारी दीपक बिल्डर्स ही पहिली कंपनी आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती.

आयपीओ कागदपत्रांनुसार, या आयपीओ अंतर्गत 1.2 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, 24 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. डीआरएचपीनुसार, प्रमोटर दीपक कुमार सिंगल आणि सुनीता सिंगल ओएफएसचा भाग म्हणून शेअर्स विकतील. सध्या, प्रमोटर् आणि प्रमोटर ग्रुप एंटीटीकडे कंपनीत 100 टक्के हिस्सा आहे.

गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या मसुद्यानुसार, आयपीओ मधून मिळणारे 95 कोटी कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरले जातील. याव्यतिरिक्त, 30 कोटी कर्ज परतफेडीसाठी वापरले जातील. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्यात येणार आहे. फेडएक्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे.

दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स इंडिया ही एक इंटीग्रेटेड इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपनी आहे जी ऍडमिनिस्ट्रेटेटिव आणि इंस्टीट्यूशनल बिल्डिंग्स, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये, इंडस्ट्रियल बिल्डिंग, हिस्टोरिकल मेमोरियल कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स यांच्या अंमलबजावणी आणि बांधकामात गुंतलेली आहे. उड्डाणपूल, ॲप्रोच रोड, रेल्वे अंडर ब्रिज, रेल्वे ओव्हर ब्रीज आणि रेल्वे स्थानकांचा विकास आणि पुनर्विकास यासारखी स्पेशलाइज्ड स्ट्रक्चरल वर्क हाती घेण्यात विविधता आणली आहे.

IPO Open
IPO News Update : आजपासून खुला होतोय जेएनके इंडियाचा आयपीओ, तुम्ही तयार आहात का ?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.