IRFC Share: IRFCच्या शेअर्समध्ये 10 टक्के अप्पर सर्किट; गुंतवणूक करावी का? काय सांगतात तज्ज्ञ

IRFC Share Price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसीच्या शेअर्समध्ये नुकतेच 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. हा शेअर बीएसईवर सध्या 176.39 रुपयांवर ट्रेड करत आहे, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे.
IRFC Share 10 percent Upper Circuit, All-Time High what expert says
IRFC Share 10 percent Upper Circuit, All-Time High what expert saysSakal
Updated on

IRFC Share Price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसीच्या शेअर्समध्ये नुकतेच 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. हा शेअर बीएसईवर सध्या 176.39 रुपयांवर ट्रेड करत आहे, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे.

गेल्या 9 दिवसांमध्ये या शेअरमध्ये 76 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपने 2.30 लाख कोटींची पातळी ओलांडली आहे. यासह, आयआरएफसी हा सर्वाधिक मार्केट कॅप असलेला रेल्वे स्टॉक बनला आहे.

2021 मध्ये लिस्टिंग झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत स्टॉकमध्ये फारशी हालचाल दिसली नाही. पण त्यानंतर 2023 मध्ये आयआरएफसीचे शेअर्स 200 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअरने 26 रुपयांच्या इश्यू किंमतीवर सूट देऊन शेअर बाजारात एन्ट्री केली. पण आता हा शेअर त्याच्या आयपीओ किंमतीच्या 6 पट जास्त म्हणजेच 176.39 रुपयांवर पोहोचला आहे.

जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये 75 टक्के वाढ झाली, जी एका महिन्यातील स्टॉकसाठी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा शेअर 53 टक्क्यांनी वाढला होता.

IRFC Share 10 percent Upper Circuit, All-Time High what expert says
Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आजपासून पुढील तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद

सरकारकडे कंपनीमध्ये अजूनही 86.36 टक्के हिस्सेदारी आहे, बाजारात फक्त 13.5 टक्के फ्री फ्लोट आहे. फ्री फ्लोटची उपलब्धता नसणे म्हणजे शेअरच्या किंमतीत तीव्र चढ-उतार दिसून येतील. सध्याच्या बाजारभावांच्या आधारे, आयआरएफसी मधील सरकारची हिस्सेदारी 1.8 लाख कोटी इतकी आहे.

"रेल्वे शेअर्स बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत. चांगल्या ऑर्डर बुकमुळे त्यांना पुढील 4-5 वर्षांमध्ये महसूल मिळेल," असे विल्यम ओ'नील इंडियाचे मयुरेश जोशी म्हणाले.

"आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये IRFC, RVNL, Railtel सारख्या काही शेअर्सचा समावेश करत आहोत. नवीन गुंतवणूकदारांनी घसरणीची प्रतीक्षा करावी कारण ते थोडे वर गेले आहेत," असे मयुरेश जोशी म्हणाले.

IRFC Share 10 percent Upper Circuit, All-Time High what expert says
IPO News: बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड IPOमधून उभारणार 745 कोटी; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.