Jai Balaji Industries : 11 महिन्यात 1 लाखाचे 26 लाख, या शेअर्सची छप्परफाड कमाई...

स्टील कंपनी जय बालाजी इंडस्ट्रीजच्या (Jai Balaji Industries) शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. केवळ 11 महिन्यांत, गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे जवळपास 26 लाख झाले.
Jai Balaji Industries
Jai Balaji Industriessakal
Updated on

स्टील कंपनी जय बालाजी इंडस्ट्रीजच्या (Jai Balaji Industries) शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. केवळ 11 महिन्यांत, गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे जवळपास 26 लाख झाले.डिसेंबर 2023 च्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 740 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या हा शेअर 1086.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.

गेल्या वर्षी, 28 मार्च 2023 रोजी जय बालाजीच्या शेअर्सची किंमत 42 रुपये होती. यानंतर, 10 महिन्यांत 2600 टक्क्यांनी झेप घेतली आणि 30 जानेवारी 2024 रोजी तो 1134 रुपयांवर पोहोचला. त्याच्या शेअर्ससाठी हा एक वर्षातील उच्चांक आहे. सध्या तो या उच्चांकावरून 4 टक्क्यांहून अधिक खाली आहे. पण, एक वर्षाच्या नीचांकी पातळीच्या तुलनेत तो अजूनही 2481 टक्क्यांनी वाढला आहे, म्हणजेच 11 महिन्यांत गुंतवणूकदारांचे 1 लाख सुमारे 26 लाख रुपयांच्या भांडवलात बदलले आहेत.

आर्थिक वर्ष 2012 ते आर्थिक वर्ष 2021 पर्यंत सतत तोटा सहन करत असलेला जय बालाजी आर्थिक वर्ष 2022 मध्ये फायदेशीर ठरला. चालू आर्थिक वर्ष 2023-24 बद्दल बोलायचे तर, एप्रिल-डिसेंबर 2023 मध्ये 606.59 कोटीचा निव्वळ नफा झाला होता, जो वार्षिक आधारावर 755 टक्के होता. डिसेंबर 2023 च्या तिमाहीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 234.60 कोटीचा निव्वळ नफा कमावला, जो वार्षिक आधारावर 740 टक्क्यांपेक्षा जास्त होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 57.8 कोटी आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये 48.1 कोटीचा निव्वळ नफा कमावला होता, तर आर्थिक वर्ष 2021 मध्ये तिचा निव्वळ तोटा 75.8 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.