Bank IPO: जना स्मॉल फायनान्स बँक लवकरच आणणार IPO, सेबीकडे पेपर्स दाखल, सर्व माहिती एका क्लिकवर

Jana Small Finance Bank: आयपीओ अंतर्गत 575 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील.
IPO
IPO Sakal
Updated on

Jana Small Finance Bank: जना स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने पुन्हा एकदा बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केले आहे. या आयपीओ अंतर्गत 575 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

त्याच वेळी, कंपनीच्या विद्यमान भागधारक आणि प्रमोटर्सकडून 40.5 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. कंपनीने यापूर्वी 31 मार्च 2021 रोजी 1200 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर दाखल केले होते. पण कोरोना काळात हा आयपीओ रद्द केला गेला.

आयपीओ अंतर्गत 17.6 लाख शेअर्स क्लायंट रोझहिल लिमिटेड, 9.3 लाख शेअर्स CVCIGP II एम्प्लॉई रोझहिल लिमिटेड, 12.2 लाख शेअर्स हीरो एंटरप्राइज पार्टनर व्हेंचर्सद्वारे 12.2 लाख शेअर्स आणि ग्लोबल इम्पॅक्ट फंड्सद्वारे 1.44 लाख शेअर्सची ओएफएसचा भाग म्हणून विक्री केली जाईल.

एक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

IPO
Multibagger Stock: 10 रुपये किंमत असणाऱ्या पेनी स्टॉकची कमाल, LIC ने 48 खरेदी केले लाख शेअर्स

कोविड महामारीचा फटका बसल्यानंतर बँकेने चांगले पुनरागमन केले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 256 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या 17.47 कोटींपेक्षा जास्त होता.

बँकेची नॉन परफॉर्मिंग ऍसेट्सही (NPA) एका वर्षापूर्वी 5.71 टक्क्यांवरून 3.94 टक्क्यांवर आली आहे. बँकेची एकूण मालमत्ता 19600 कोटी रुपये आहे.

IPO
Multibagger Stock: बोनस शेअर्ससह स्टॉक स्प्लिट जाहीर, गुंतवणूकदारांच्या पैशात 32 पट वाढ, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

ज्यात होम लोन, गोल्ड लोनर्ज आणि सिक्युअर्ड बिझनेस लोन यांचा समावेश आहे. लिस्टींगची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, बँक युनिव्हर्सल बँकिंग परवाना मिळवण्यासाठी काम करणार असल्याचे समजते आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.