जेजी केमिकल्सचा (JG Chemicals) आयपीओ आजपासून खुला झाला आहे. 251 कोटीच्या या आयपीओमध्ये 5 ते 7 मार्चमध्ये बोली लावता येणार आहे. कंपनीने आयपीओसाठीचा प्राइस बँड 210-221 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. कंपनीच्या 251.2 कोटीच्या आयपीओमध्ये 165 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, यामध्ये 86.2 कोटीपर्यंतच्या 39 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेलही (OFS) समाविष्ट असेल.
गुंतवणुकदार या आयपीओसाठी लॉट साईजनुसार गुंतवणूक करु शकतील. एका लॉटमध्ये 67 इक्विटी शेअर्स असतील. म्हणजेच रिटेल गुंतवणुकदारांना किमान 14, 067 रुपये इन्व्हेस्ट करायला लागतील. ऑफर फॉर सेल अंतर्गत, व्हिजन प्रोजेक्ट्स आणि फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, सुरेश कुमार झुनझुनवाला (HUF), अनिरुद्ध झुनझुनवाला (HUF) आणि जयंती कमर्शियल लिमिटेड इक्विटी शेअर्स ऑफर करतील.
91 कोटीच्या ताज्या इश्यूची रक्कम जेजी केमिकल्सची सामग्री उपकंपनी असलेल्या बीडीजे ऑक्साइडमधील गुंतवणुकीसाठी वापरली जाईल आणि 35 कोटीचा वापर कंपनीच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाईल. याशिवाय एक भाग कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी ठेवण्यात येणार आहे.
ही कोलकाता स्थित कंपनी उत्पादन आणि कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी झिंक ऑक्साईड उत्पादक आहे. बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. 13 मार्चपर्यंत हे शेअर्स लिस्ट केले जातील.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.