Jio Financial Services Share: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी सोमवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आणि तेव्हापासून कंपनीचा शेअर वाढलेला नाही. कंपनीच्या शेअर्सची घसरण आज सलग चौथ्या दिवशीही कायम राहिली आहे.
मंगळवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 227.25 रुपयांवर बंद झाला आणि आज 215.90 रुपयांवर उघडला. भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचे शेअर्स चार दिवसांत 20 टक्क्यांनी घसरले आहेत.
घसरणीच्या चार दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 30,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. इंडेक्स फंडांच्या विक्रीमुळे कंपनीचे शेअर्स घसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कंपनीचे मार्केट कॅप आता 1,37,167.41 कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडेच आपला आर्थिक व्यवसाय डिमर्ज केला आणि त्याचे नाव बदलून Jio Financial Services Limited असे ठेवले.
रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक शेअरसाठी JFSL चा एक शेअर देण्यात आला. 20 जुलै रोजी प्री-लिस्टिंगमध्ये, त्याचे मूल्य 261.85 रुपये होते, जे ब्रोकरेज कंपन्यांच्या अंदाजापेक्षा जास्त होते. 21 ऑगस्ट रोजी, कंपनीचा शेअर बीएसईवर 265 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता, तर एनएसईवर तो 262 रुपयांवर सूचीबद्ध होता.
कंपनीचा शेअर का घसरत आहे?
संस्थात्मक फंडांनी मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री केल्यामुळे, गेल्या सलग चार दिवसांपासून कंपनीचा शेअर लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. 23 ऑगस्ट रोजी कंपनीचे शेअर्स निफ्टी आणि सेन्सेक्समधून बाहेर काढले जाणार होते परंतु आता 29 ऑगस्ट रोजी ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी काढले जातील.
BSE ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, JFSL चा स्टॉक पुढील दोन दिवस लोअर सर्किटमध्ये अडकला तर काढण्याची तारीख आणखी तीन दिवसांनी वाढवली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.