Jio Financial Services Share Price: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर गेल्या आठवड्यात घसरत होता. मात्र गेल्या पाच दिवसांपासून शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. आज बुधवारी शेअर बाजार उघडताच कंपनीच्या शेअरने 5 टक्के वाढ नोंदवली आहे. 30 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर 231.25 रुपये प्रति शेअर होता. मंगळवारी बाजार बंद होईपर्यंत शेअरचे भाव 4.31 टक्क्यांनी वधारले होते.
मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची प्रवर्तक कंपनी असलेल्या जामनगर युटिलिटीज अँड पॉवरने 208 ते 211 रुपये प्रति शेअर या दराने 5 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. यापूर्वी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसबाबत आणखी एक मोठा करार झाला होता.
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने शुक्रवार 25 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या प्रमाणात डील करून Jio Financial Services चे 3.72 कोटी शेअर्स 202.8 रुपये किंमतीत खरेदी केले. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर सतत वाढत आहे. आज कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरने 24 ऑगस्ट 2023 ते 30 ऑगस्ट 2023 पर्यंत 8.34% परतावा दिला आहे. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या लिस्टिंगनंतर कंपनीने अप्पर सर्किटला येण्याची ही दुसरी वेळ आहे.
कंपनी प्रामुख्याने कर्ज देणे, विमा क्षेत्र, पेमॅट, डिजिटल ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन या व्यवसायात प्रवेश करत आहे. कंपनीने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी BlackRock सोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.