Jio Financial Services: मुकेश अंबानी यांची नवीन कंपनी Jio Financial Services Limited चा शेअर उद्या म्हणजेच 7 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी-50 निर्देशांकातून काढून टाकण्यात येणार आहे. या संदर्भात मंगळवारी एनएसईने माहिती दिली.
मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअलचा शेअर आधीच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधून डिलिस्ट करण्यात आला आहे आणि सध्या निफ्टी-50, निफ्टी-100, निफ्टी-200, निफ्टी-एनर्जी, निफ्टी-इंडिया मॅन्युफॅक्चरिंग यासह अन्य 13 निर्देशांकांमध्ये त्याचा समावेश आहे.
NSE कडून स्पष्ट करण्यात आले आहे की बुधवारी ट्रेडिंग केल्यानंतर तो निर्देशांकाच्या बाहेर काढला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत तो बाहेर काढण्याची प्रक्रिया पुढे ढकलली जाणार नाही. त्याचा परिणाम जिओ फायनान्शियल शेअरवरही दिसून येईल.
शेअर मार्केटमध्ये 21 ऑगस्ट रोजी लिस्टिंग करण्यात आली
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्ज करून अस्तित्वात आली आहे. डिमर्जरनंतर रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटचे नाव बदलून जिओ फायनान्शियल करण्यात आले आहे.
या कंपनीसाठी 20 जुलै रोजीच्या विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर्सची किंमत प्रति शेअर 261.35 रुपये निश्चित करण्यात आली होती.
यानंतर, शेअर मार्केटमध्ये या शेअरची लिस्टिंग 21 ऑगस्ट 2023 रोजी 265 रुपयांवर झाली, परंतु लिस्टिंग दिवसापासूनच त्यात सतत घसरण दिसून येत आहे.
बीएसईने सर्किट मर्यादा बदलली आहे
अलीकडेच बीएसईने मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शिअलची सर्किट मर्यादा बदलली आहे आणि ती पाच टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आली आहे. जिओ फिनचा शेअर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी मंगळवारी तेजीसह बंद झाला.
ट्रेडिंगच्या शेवटी, जिओ फिनचा शेअर 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 255.05 रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे बुधवारी त्यात पुन्हा घसरण दिसून आली.
जिओ फिन विमा क्षेत्रात प्रवेश करणार
Jio Financial Services चे मार्केट कॅप 1.59 लाख कोटी रुपये आहे आणि त्याची आतापर्यंतची सर्वकालीन उच्च पातळी 266.95 रुपये आहे. नुकत्याच झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM 2023) मुकेश अंबानी यांनी जिओ फिनचा रोडमॅप सांगितला होता. यादरम्यान ते म्हणाले होते की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लवकरच विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.