Multibagger Stocks: 'या' सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या तेजीची शक्यता, काय आहे कारण?

Multibagger Stocks: सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेके लक्ष्मी सिमेंटचे शेअर्स गेल्या आठवड्यातील विक्रमी उच्चांकावरुन आता सुमारे 7% घसरलेत. मात्र तज्ज्ञांच्या मते या घसरणीकडे गुंतवणुकीची सुवर्णसंधी मानली पाहिजे.
JK Lakshmi Cement, target price Rs 1000 Axis Securities
JK Lakshmi Cement, target price Rs 1000 Axis Securities Sakal
Updated on

Multibagger Stocks: सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेके लक्ष्मी सिमेंटचे शेअर्स (JK Lakshmi Cement) गेल्या आठवड्यातील विक्रमी उच्चांकावरुन आता सुमारे 7% घसरलेत. मात्र तज्ज्ञांच्या मते या घसरणीकडे गुंतवणुकीची सुवर्णसंधी मानली पाहिजे.

कारण या शेअरने 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. शॉर्ट टर्मचा विचार केल्यास केवळ पाच महिन्यांत कंपनीने 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ब्रोकरेजच्या मते, सिमेंटच्या वाढत्या मागणीमुळे जेके लक्ष्मी सिमेंटमध्ये दमदार तेजी दिसून येईल.

त्यामुळे सध्या घसरण झालेली असताना तुम्ही सध्याच्या पातळीवर गुंतवणूक(investment) करून 17 टक्क्यांहून अधिक नफा मिळवू शकता. त्याचे शेअर्स बीएसईवर सध्या 851.85 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

28 नोव्हेंबर 2003 रोजी जेके लक्ष्मी सिमेंटचे शेअर्स (Shares) केवळ 6.99 रुपयांवर होते. आता ते 851.85 रुपयांवर आहेत, म्हणजेच केवळ 20 वर्षांत 83 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले.

31 जुलै 2023 रोजी तो 608.10 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या पातळीपासून, पाच महिन्यांत 50 टक्क्यांहून अधिक उसळी घेत कंपनीचा शेअर 14 डिसेंबर 2023 रोजी 915.35 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर गेला.

JK Lakshmi Cement, target price Rs 1000 Axis Securities
स्वस्त सोन्यात गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस; सरकार 10 ग्रॅम सोन्यावर देत आहे मोठी सूट

सरकार ज्या प्रकारे पायाभूत सुविधांवर भर देत आहे, त्यामुळे सिमेंटची (Cement) मागणी झपाट्याने वाढण्याची आशा आहे. याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्रातूनही मागणी वाढत आहे. खासगी कंपन्या आपला खर्च वाढवत आहेत आणि इंडिविजुअल देखील वेगाने घरे बांधत आहेत.

या सर्व प्रकारामुळे सिमेंटची मागणी वाढेल ज्यामुळे जेके लक्ष्मी सिमेंटच्या व्यवसायाला सपोर्ट मिळेल. या व्यतिरिक्त, जेके लक्ष्मी सिमेंट आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे.

JK Lakshmi Cement, target price Rs 1000 Axis Securities
Income Tax Raid: पॉलीकॅबच्या 50 हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे, शेअर्समध्ये मोठी घसरण

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()