IPO News: पैसे तयार ठेवा! 23 एप्रिलला खुला होणार जेएनके इंडियाचा आयपीओ; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

JNK India IPO: जेएनके इंडियाचा (JNK India) आयपीओ 23 एप्रिलला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. 25 एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी असेल. हा आयपीओ 22 एप्रिलला एका दिवसासाठी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.
JNK India IPO to open for bids on April 23, close on April 25
JNK India IPO to open for bids on April 23, close on April 25Sakal
Updated on

JNK India IPO: जेएनके इंडियाचा (JNK India) आयपीओ 23 एप्रिलला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. 25 एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी असेल. हा आयपीओ 22 एप्रिलला एका दिवसासाठी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. या आयपीओअंतर्गत 300 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, विद्यमान भागधारक आणि प्रमोटर्सकडून 84.2 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील.

गौतम रामपेली ओएफएसचा भाग म्हणून 11.2 लाख शेअर्स विकणार आहेत. याशिवाय, जेएनके ग्लोबलचे 24.3 लाख शेअर्स, मॅस्कॉट कॅपिटल अँड मार्केटिंगचे 44 लाख शेअर्स आणि मिलिंद जोशीचे 4.68 लाख शेअर्स विकले जातील. फ्रेश इश्यूमधून जमा झालेला निधी खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी वापरला जाईल. आयआयएफएल सिक्युरिटीज आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज यासाठीचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

JNK India IPO to open for bids on April 23, close on April 25
IPL 2024 Ticket Price: आरसीबीच्या एका सामन्याच्या तिकिटाची किंमत 52,938 रुपये; कोण ठरवत किंमत?

जेएनके इंडिया तेल रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल प्लांट यांसारख्या प्रक्रिया उद्योगांसाठी हीटिंग इक्विपमेंट्स तयार करते. कंपनी डिझाईनपासून इंस्टॉलेशनपर्यंत सर्व काही सांभाळते आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेवा पुरवते. त्याची भारतातील स्पर्धक थर्मेक्स लिमिटेड (Thermax Limited) आहे. कंपनीने फ्लेअर्स, इन्सिनरेटर सिस्टीममध्येही विस्तार केला आहे आणि आता ग्रीन हायड्रोजनसह रिन्यूएबल सेक्टरमध्ये प्रवेश करत आहे.

JNK India IPO to open for bids on April 23, close on April 25
NPCI Meeting: NPCIकडून यूपीआयच्या मीटिंगसाठी गुगल, फोनपे आणि पेटीएमला निमंत्रण नाही; काय आहे कारण?

31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीची ऑर्डर बुक एकूण 845.03 कोटी होती, त्यापैकी 86.29 टक्के भारतातील आणि 13.71 टक्के परदेशातील होती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.