JSW Infrastructure IPO: गुंतवणूकदार मालामाल! BSE वर 20% प्रीमियमसह कंपनी झाली लिस्ट

JSW Infrastructure IPO listing: कंपनीचे शेअर बीएसई वर 143 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाले
JSW Infrastructure IPO
JSW Infrastructure IPOSakal
Updated on

JSW Infrastructure IPO listing: आज देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या JSW समूहाची आणखी एक कंपनी बाजारात लिस्ट झाली आहे. JSW Infra चे शेअर्स 119 रुपयांना जारी करण्यात आले होते.

आज ते बीएसई वर 143 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाले आहेत, याचा अर्थ IPO गुंतवणूकदारांना 20 टक्के लिस्टिंग फायदा झाला आहे. लिस्ट झाल्यानंतरही, शेअर्सची वाढ थांबली नाही आणि सध्या कंपनीचा शेअर बीएसईवर 148.75 रुपये आहे, म्हणजेच IPO गुंतवणूकदारांच्या पैशात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

JSW Infrastructure IPO
Pension Scheme: मोदी सरकारचा नवा प्लॅन, निवडणुकीपूर्वी पेन्शन हमी योजना जाहीर करणार?

कंपनीची आर्थिक बाजू मजबूत आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये, कंपनीचा निव्वळ नफा 196.53 कोटी रुपये होता, पुढील आर्थिक वर्ष 2021 मध्ये 284.62 कोटी रुपये आणि नंतर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 330.44 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, 749.51 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला.

JSW Infrastructure IPO
Godrej Group: 126 वर्ष जुन्या गोदरेज ग्रुपचे होणार तुकडे! कोट्यवधी रुपयांचे होणार दोन भाग, काय आहे कारण?

कंपनीची स्थापना 2006 मध्ये झाली

JSW इन्फ्रा ची स्थापना 2006 मध्ये झाली. कंपनी कार्गो हाताळणी, स्टोरेज सोल्यूशन्स आणि लॉजिस्टिक सेवांसह सागरी संबंधित सेवा व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी केवळ बंदरे विकसित करत नाही तर ती चालवते.

JSW इन्फ्रास्ट्रक्चरचा IPO 25 सप्टेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. यामध्ये बोली लावण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर होती. 28 सप्टेंबर रोजी आयपीओचे वाटप झाले.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.